चंद्रपूर तेलंगना सिमा नाक्यावर झालेल्या एसीबी कार्यवाही नंतर देवरी येथील सीमा तपासणी नाका येथे पण कार्यवाही.
RTO चा पंचनामा भाग :-16
प्रादेशिक परिवहन कार्यालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून येथे सर्वसामान्य वाहन धाराकांना लुटण्यासाठी RTO अधिकाऱ्यांनी एक गैग बनवली आहें, त्या गैग चा मुखीया हा प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असतो तर त्यांचे माल गोळा करणारे सहाय्यक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व त्यांचे खाजगी एजंट मिळून पैशाची लूट करण्यात येते ही वस्तुस्थिती आहें, दरम्यान राज्यातील सर्व RTO सिमा नाके केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वीच बंद केले असतांना भ्रष्टाचाराची चटक लागलेले RTO अधिकारी या सिमा नाक्यावर अवैध वसुली करत आहें, नुकतेच चंद्रपूर तेलंगना सिमा नाक्यावर बेकायदेशीर वसुली करताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट ला एसीबीच्या अमरावती टीम ने 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले होते, या कारवाईत RTO अधिकारी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांचा सहभाग असतांना सुद्धा त्यांना अटक केली नाही, दरम्यान आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती झाली असून गोंदिया जिल्ह्यातील देवरी आरटीओ सीमातपासणी नाक्यावर ट्रकचालकाकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना मोटारवाहन निरीक्षक आणि दोन व्यक्तींना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने (एसीबी) शुक्रवारी (दि. ११) पहाटे ४ वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले.
एका ट्रक चालककांकडून लाच स्वीकारताना पकडलेल्या मौटारवाहन निरीक्षकाचे नाव योगेश गोविंद खैरनार (वय ४६, रा. नागपूर) असे असून त्यांचे सोबत नरेंद्र मोहनलाल गडपायले (६३, रा. बुद्ध विहारच्या मागे, नारायण लॉन्स जवळ, मराळटोली, आझाद वॉर्ड, गोंदिया व आश्लेष विनायक पाचपोर (४५, रा. अमरावती) अशी अन्य दोघांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मालवाहतुकीचा ट्रेलर भंडारा देवरी मार्गे रायपूरकडे जात असताना, आरटीओ सीमातपासणी नाका, शिरपूर येथे काही कारण नसताना एन्ट्री द्यावी लागेल, असे सांगून ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करीत रक्कम स्वीकारली असताना आरोपी लोकसेवक योगेश खैरनार यांना अटक करण्यात आली.
एसीबीने सापळा रचला
एसीबीच्या पथकाने सापळा यशस्वी करण्यासाठी देवरी आरटीओ सीमातपासणी नाक्यावर एका बनावट व्यक्तीला ट्रकचालक म्हणून पाठविले. त्यानंतर संबंधित चालकाकडून कागदपत्रांवर सही केल्यानंतर निरीक्षकाला लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोटारवाहन निरीक्षकाला रंगेहाथ पकडले.
योगेश खैरनार यास प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (ग्रामीण) २८ मार्च २०२५ रोजीच्या आदेशान्वये इंटरसेप्टर-५ (रस्ता सुरक्षा पथक) येथे नेमलेले होते. पण, नागपूर ग्रामीणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या आदेशान्वये देवरी आरटीओ तपासणी नाक्यावर मौखिक आदेशाने नियुक्ती केली होती. मात्र, खैरनार यांनी दोघांना बेकायदेशीरपणे शिरपूर आरटीओ सीमातपासणी नाका येथे नेमले. तसेच त्यांच्या माध्यमातून मुंबई-कोलकाता महामार्गाने जाणाऱ्या मालवाहू वाहनचालकांकडून एन्ट्रीच्या नावाखाली खासगी व्यक्तींमार्फत लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारली. दरम्यान या प्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन एसीबी नाशिकच्या पथकाने देवरी पोलिस येथे गुन्हा दाखल केला. ही कारवाई एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप घुगे, पोलिस हवालदार गणेश निंबाळकर, पोलिस शिपाई नितीन नेटारे यांनी केली.
नेमके कोण दोषी?
योगेश खैरनार हे लाच मागण्यासाठी स्वतः जबाबदार नसून त्यांना आदेश देणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जबाबदार आहें, त्यामुळे योगेश खैरनार यांच्यासह वरील अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी होतं आहें.