Home चंद्रपूर कल्पना सोनवणे या विधवा दलित महिलेचे घर उध्वस्त करणाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही,

कल्पना सोनवणे या विधवा दलित महिलेचे घर उध्वस्त करणाऱ्यांना शिवसेना सोडणार नाही,

शहर प्रमुख प्रमोद पाटील यांचा इशारा !

आरोपींनी जे शस्त्र आणले त्या शस्त्रासह जेशीपी मशीन्स जब्त करून आरोपी विरोधात अक्ट्रोसिटी अक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी !

चंद्रपूर :-

शहरातील वडगाव प्रभागातील अपेक्षा नगर मधील कल्पना सोनवणे या विधवा दलित महिलेचे पूर्णत्वास आलेल्या घराला ले-आउटकडे जाण्यास अडथळा होत असल्याने शहरातील मोठे बिल्डर दत्तात्रय कन्चार्लावार आणि गजानन निलावार यांनी मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता,शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, उपजिल्हा अध्यक्षा माया मेश्राम, मनीषा तोकलवार या महिलांना सुपारी देवून बुलडोजरने जमीनदोस्त केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

वडगाव प्रभागातील अपेक्षा नगरात दलित विधवा महिला कल्पना सोनवणे मुलगी पल्लवी आणि मुलगा कोमल, उत्तम सोनवणे यांच्यासह वास्तव्यास आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर अपेक्षा नगर मधील नझूलच्या जागेवर झोपडी बांधून त्या आपल्या पाल्यांचे पालनपोषण करीत होत्या.
आपल्या परिवाराचे मोलकरीणचे काम करून पालनपोषण करणाऱ्या कल्पना सोनवणे यांनी अतिशय परीश्रमाणे पाई पाई जमवून पैसे गोळा केले व घर बांधले, त्यात त्यांच्या मुली आणि मुलांचे सुद्धा परिश्रम आहे, गेल्या तीस वर्षांपासून नझुलच्या जागेवर वास्तवात असलेल्या कल्पना सोनवणे यांचे घर अचानक कुठलीही सूचना न देता व घरात कुणीही नसतांना मनसेचे भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मनीषा कोतलवार व इतरानी बिल्डर दत्तात्रय कन्चार्लावार आणि गजानन निलावार यांच्याकडून सुपारी घेवून बुलडोजरने जमीनदोस्त केल्याने दलित समाजावर एक प्रकारे बिल्डर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी आघात केला आहे.

डोळ्यासमोर घराचे बांधकाम जमीनदोस्त झाल्यानंतरही जिवे मारण्याच्या धमकीने व तलवारी चाकू छुरी दाखवल्याने पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली नाही. मात्र, शिवसेनेच्या मदतीने परिसरातील नागरिकांनी एकत्र येत बिल्डर्सच्या या प्रवृत्तीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्तम सोनवने यांनी परिसरातील चांदणीबाई मलिक, देविदास राऊत, चेतना भाटी यांच्या मदतीने रामनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बिल्डर दत्तात्रेय कन्चार्लावार, गजानन निलावार, भरत गुप्ता व अन्य सात ते आठ व्यक्तीविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४९, ४४८, ४२७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. मात्र सोबतच प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मनीषा तोकलवार यांची नावे जाहीर केली नाही ती जाहीर करावी व त्यांचेवर धारदार शस्त्र बाळगणे व जोरजबरदस्तीने दलित विधवा महिलेचे घर उध्वस्त करण्यासंदर्भात इतर गंभीर कलमासोबतच अक्ट्रोसिटी अक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करायला हवे होते मात्र आरोपी खुलेआम फिरत आहे, आरोपीकडून धारदार शस्त्र आणि बुलडोजर पोलिसांनी जब्त केले नाही यावरून पोलिस त्यांचेवर कारवाई करीत नाही ही बाब अतिशय गंभीर असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दखल घ्यायला घ्यावी असे आव्हान सुद्धा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषद केले.
एका दलित विधवा महिलेचे घर गुंडाकडून पाडणे ही घटना अतिशय वाईट असून आपण जणू बिहार राज्यात आहो कां ? असा प्रश्न पाडणारी आहे. कारण कायदा हातात घेवून एका दलित परिवाराचे घर हातात तलवारी, चाकू घेवून बुलडोजरणे पाडणे म्हणजे बिहार पेक्षा जास्त गुंडगिरी इथे मनसेचे भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मनीषा तोकलवार व अन्य लोकांनी चालविलेली आहे, त्यामुळे ही बाब पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा कळस म्हणावी लागेल, त्यामुळे आता पोलिस प्रशासनाने अक्ट्रोसिटी अक्ट व इतर गंभीर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे, परंतु पोलिसांनी आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल केले नसल्याने या प्रकरणात पिडीत विधवा दलित महिलेला न्याय दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यापुढे हे प्रकऱण घेवून जावू व या प्रकरणांमध्ये भरत गुप्ता सह प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, मनीषा तोकलवार व इतर मुलांचा शोध घ्यायला पोलिसांना बाध्य करू आणि बिल्डर निलावार व कन्चर्लावार यांच्या संपतीची चौकशी लावू असा इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद पाटील यांनी दिला आहे. प्रसंगी शिवसेनेच्या जिल्हा संघटिकां कुसुम उदार,  स्वप्नील काशीकर व पिडीत महिला उपस्थित होती.

Previous articleधक्कादायक :- कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांचा नागपूर येथे तीनपट धंदा ?
Next articleखास बातमी :- दहावीचा अखेरचा पेपर पुढे ढकलला,३१ मार्च नंतर होणार घोषणा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here