मराठी कामगारांना दालमिया कंपनीत दडपशाही करून 27 कामगारांना कामावरून कमी केल्याने संताप.
चंद्रपूर:-
दालमिया सिमेंट भारत लिमिटेड कंपनी अंतर्गत चिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची संघटना स्थापन झाल्यानंतर कंपनी च्या एच आर अरविंद बरवा यांनी मनसे कामगार सेनेच्या तीन सदस्य कामगारांना सुडबुद्धीने बेकायदेशीरपणे काढून टाकल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कंपनी परिसरातील गावातील नागरिकांना घेऊन जनआंदोलन करेल असा इशारा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी दिल्यानंतर मुजोर कंपनी एच आर अरविंद बरवा यांनी पुन्हा 27 कामगारांना उद्यापासून कामावर येऊ नका असा फतवा जारी करून कंपनी मध्ये कामगारांना कसे गुलाम बनविण्याचे कारस्थान रचून दडपशाही सुरु आहें याची प्रचिती येत आहें, दरम्यान कंपनी एच आर अरविंद बरवा हे परप्रांतीय अधिकारी असून त्यांच्या माध्यमाध्यमातून मराठी कामगारांना कशी वागणूक मिळत असेल हे आता स्पष्ट होतं असून परप्रांतीय अरविंद बरवा याचा बंदोबस्त दालमिया सिमेंट कंपनी संचालकांनी लावावा अन्यथा मराठी कामगारांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मोठे जनआंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहें.
जिल्ह्यातील सिमेंट उद्योगात मोठ्या प्रमाणात कामागारांचे आर्थिक शोषण होतं असून स्थानिक राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीने कंपनी व्यवस्थापनाला मोठे बळ मिळत आहें, मात्र यामध्ये कामगारांना त्यांचे घटनादत्त अधिकार मिळत नाही, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने तर्फे आम्ही अन्याय पिडीत कामगारांना त्यांचे कामगार कायाद्यानुसार वेतन व इतर सुविधा मिळाव्या म्हणून कार्यरत आहो, दरम्यान गडचांदूर परिसरातील दालमिया सिमेंट भारत लिमिटेड कंपनी मध्ये कंत्राटी कंपनी चिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने जवळपास कंपनीच्या एका युनिट मधील 30 कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सदस्यत्व स्वीकारून न्यायासाठी आम्हांला विनंती केली आहें, मात्र त्या अगोदरचं कंपनी व्यवस्थापनाने त्यापैकी नेतृत्व करणाऱ्या तीन कामगारांना ( सौरभ बबन काकडे, अनिकेत मारोती घुगुल, राजकुमार विठोबा कोरांगे,) कुठलीही पूर्व सूचना न देता काल दिनांक 29 मे 2025 पासून परस्पर कामावरून कमी केले आहें, या संदर्भात स्थानिक सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्या कामगारांना कामावर घ्यावं अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली होती, परंतु सायंकाळी मनसे सदस्य असणाऱ्या पुनः 27 कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहें, त्यामुळे मनसे पदाधिकारी आक्रमक होऊन त्या एच,आर अरविंद बरवा यांचेविरोधात दालमिया कंपनी संचालकांना तक्रार देणारं व त्यालाच कंपनीतून हाकला अशी मागणी असल्याची माहिती आहें.
खरं तर ज्या कामगारांना कंपनीत किमान वेतन मिळत नसेल आणि त्यांचे आर्थिक शोषण होतं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार अन्याय पिडीत त्या कामगारांना न्याय मिळवून देणे आपले कर्तव्य समजते, त्यामुळे या प्रकरणी त्वरित दालमिया सिमेंट भारत लिमिटेड व्यवस्थापनाला त्या तीन कामगारांना कामावर घेण्याचे आदेश द्यावे अन्यथा आम्ही सभोतालच्या गावातील नागरिकांना एकत्र करून कंपनी विरोधात मोठे जनआंदोलन उभारू व यासाठी आपण व कंपनी जबाबदार असेल असा इशारा मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहें, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, विधी विभाग जिल्हाध्यक्ष अँड.अजित पांडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, दालमिया सिमेंट कंपनीचे पिडीत कामगार व इतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.