एका गोपनीय तक्रारीतुन उघडं झाली चोरी, महिला अभियंता सांबरे सह हेल्पर राजगिरेचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती.
चंद्रपूर:-
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार हा जणू शिष्टाचार झाला असून त्यात महिला अधिकारी सुद्धा सामील असल्याची माहिती समोर येत असल्याने या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातील महावितरण कंपनी चे चालले तरी काय? हा प्रश्न उपस्थित होतं आहें, दरम्यान चंद्रपूर येथील महावितरण च्या बाबुपेट मेजर स्टोर सेंटरमध्ये लाखोंची भंगार चोरी एका गोपनीय तक्रारी द्वारे समोर आल्याने आणि त्यात महिला अभियंता सांबरे सह हेल्पर राजगिरेचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर पकडू लागली आहें.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ चंद्रपुरच्या बाबुपेट मेजर स्टोर सेंटरमधील सुमारे 8 ते 10 लाख रुपयाच्या स्क्रॅप अफरातफर प्रकरणी वरीष्ठ स्तरावर ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली असल्याची सूत्रानुसार माहीती असून या प्रकरणात महिला अभियंता सांबरे सह हेल्पर राजगिरे यांचा सहभाग असल्याचे तक्रारींमध्ये म्हटले आहेत.
दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या विविध कार्यालयामधून सुमारे ५५ टन स्क्रैप लोखंड बाबुपेठ स्टोर सेंटरमध्ये कागद पत्रासह आणण्यात आले होते. परंतु जेंव्हा ह्या स्क्रॅप चा लिलाव झाला किंव्हा ते विकायला काढले त्यावेळी विक्रेत्याला विकण्यात आलेले स्क्रॅप केवळ २५ ते ३० टन शिल्लक होते याचा अर्थ सुमारे २० ते २५ टन स्क्रैप हे अगोदरच चोरीला गेले किंव्हा संगनमत करून परस्पर विकल्या गेल्याची शक्यता आहें,
का आहें महीला अभियंता सांभरे यांच्यावर आरोप?
बाबुपेठ स्टोर सेंटरमधून जेंव्हा विक्रेत्याच्या ट्रकमधून स्क्रॅप बल्लारशहा येथे वजनासाठी नेण्यात आले, तेव्हा ट्रकमधून काही स्क्रॅप बाहेर फेकण्यात आले होते, ज्यामुळे वजन कमी दाखवण्यात आले. हे प्रकरण दोन तंत्रज्ञांनी पाहिले होते आणि त्याचा विडीयो घेण्यात आला होता व त्यांनी ही माहिती अभियंता सांबरे मॅडम यांना सांगितली, पण त्यांनी काहीही केले नाही.उलट, विक्रेत्याकडून पैसे घेऊन प्रकरण तेथेच दाबून दिले. व तेथील एक तंत्रज्ञ जाधव ला गेट पास वर सांभरे यांनी दबावतंत्राचा वापर करून स्वाक्षरी करायला भाग पाडले. दरम्यान स्टोरमध्ये स्क्रॅप कमी असल्याचे लक्षात येताच सांबरे ह्या इतर स्टोअरमधून सामग्री अधिकृत दस्तावेज बोलावुन ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. सुमारे २० टन स्क्रैप लोखंड गहाळ झाले आहे आणि त्याचे मूल्य दर अंदाजे किलो ४० रूपये प्रमाणे अंदाजे १८ लाख इतके असू शकते. सदरील प्रकरण हे महिला अभियंता सांबरे यांनी स्वतः केले असून ते फार गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीतुन वरिष्ठाना केली आहें. आता या प्रकरणात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लगलेले आहें.