Home चंद्रपूर सनसनी :- सेवाज्येष्ठ अभियंत्याला डावलून कनिष्ठ अभियंत्याला प्रभार दिल्याने अभियंता संघटनेचा आक्रोश.

सनसनी :- सेवाज्येष्ठ अभियंत्याला डावलून कनिष्ठ अभियंत्याला प्रभार दिल्याने अभियंता संघटनेचा आक्रोश.

चंद्रपूरच्या बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंत्याला जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पोंभुर्णा व राजुरा येथे अतिरिक्त पदभार देण्यात आल्याने जिल्हापरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह?

चंद्रपूर :-

सेवाज्येष्ठ शाखा अभियंत्यांना डावलून शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांचे शासन निर्णयाचे उल्लंघन करत जिल्हा परिषद, चंद्रपूरच्या बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंत्याला जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पोंभुर्णाचा अतिरिक्त पदभार देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहेत. ते प्रकरण ताजे असतांनाच जिल्हा परिषद बांध उपविभाग राजुरा येथे सुदधा उपअभियंता पदाचा प्रभार देतांनी तर सर्व नियमांचीच ऐसीतैसी करण्यात आली आहे. राजुरा येथे सेवेत कनिष्ठ अश्या कर्मचाऱ्यास प्रभार देवुन प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांवर व संघटनेवर कुरखोडी केलेली आहे. सदर प्रभार देण्यात काही आर्थिक गैरव्यवहार झाला असे तालुक्यातील लोकांचे म्हणणे आहे. या गैरप्रकारामुळे प्रशासनात विरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोर्षीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र (राज्यस्तर) यांनी विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त प्रभार सोपविताना 5 सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. मात्र त्या सूचनांचे उल्लंघन करत उपविभागात 15 ते 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी असतानासुद्धा केवळ तीन वर्षांचा अनुभव असलेल्या कनिष्ठ अभियंता शुभानी दोषी व कु प्रमोदिनी मेंढे यांना प्रभार देण्यात आलेला आहे. एकंदरीत सर्व व्यवहाराची सखोल चौकशी करुन दोषी अधिका-यांवर कठोर कारवाईची मागणी संघटना करीत आहे. या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि अनियमिततेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा अभियंता संघटनेने केली आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

अन्यथा आंदोलन करणार……

जिल्हा परिषद चंद्रपूर च्या बांधकाम विभागात रिक्त पद तातडीने भरावेत बांधकाम विभागातील बदली व पदोन्नती प्रक्रियेद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त उपअभियंता पदे तातडीने भरावीत, अशी देखील विनंती करण्यात आली आहे. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद अभियंता संघटनेने निवेदनातून दिला आहे.

दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी

पदभार देताना मोठ्या प्रकारचा गैरव्यवहार व अनियमितता झाली, असा आरोप संघटनेनी करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनिक जबाबदारी निश्चित करावी, बांधकाम विभागातील बदली व पदोन्नती प्रक्रियेद्वारे रिक्त उपअभियंत्यांची पदे भरावी, अशी मागणी संघटनेने निवेदनातून केली आहे.

वरिष्ठ अभियंता असतानाही कनिष्ठांना पदभार देणे हा अन्याय आहे. प्रशासनाने नियमानुसार काम करून सेवाज्येष्ठ अभियंत्याला न्याय द्यावा, तसेच या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.
विनोद शहारे, अध्यक्ष, जिल्हा परिषद अभियंता, संघटना, चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here