Home चंद्रपूर लक्षवेधी :- जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदीय आयुधांचा अधिवेशनातून वापर करणारे मुंगनटीवार जगावेगळेचं..

लक्षवेधी :- जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदीय आयुधांचा अधिवेशनातून वापर करणारे मुंगनटीवार जगावेगळेचं..

सत्तेत असुन सुद्धा अख्ख अधिवेशन गाजविणारे सुधीर मुंगनटीवार गोरगरीब शोषित पिडीत, तरुण बेरोजगार व शेतकऱ्यांचा विधानसभा सभागृहातील आवाज बनलेय.

लक्षवेधी:-

सन 2024 च्या महायुती सरकार मध्ये भाजप चे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळाले नाही, पण त्यांनी मागील दोन अधिवेशनात सरकारला घरचा अहेर देतं जनतेच्या अनेक प्रश्नासाठी धारेवर धरले, त्यामुळे त्यांनी विरोधकांची भूमिका घेतली असा त्यांचेवर आरोप होतं आहें, मात्र आपल्या संघर्षशील राजकीय जिवनात कुशल संघटन कौशल्याने आणि सामाजिक बांधिलकीला जोपासून दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणारे नेते सुधीर मुनगंटीवार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपला संसदीय आयुधांचा अधिवेशनातून वापर करत स्वतःच्याच पक्षाच्या मंत्र्यांना धारेवर धरतात हा खऱ्या अर्थाने मुंगनटीवार यांचा जगावेगळा प्रयत्न कदाचित महाराष्ट्राच्या संसदिय राजकारणात क्वचितच कोणी केला असेल, मला मंत्री केलं नाही म्हणून मी सरकारच्या विरोधात बोलत नाही तर मागील अनेक वर्ष मी विरोधात असतानाही प्रश्न मांडले होते, कारण गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी जनतेने आम्हांला निवडून दिले त्या जनतेचा विश्वास महत्वाचा आहें असं मतं सुधीर मुनगंटीवार यांनी अनेकदा व्यक्त केल आहें.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या उभारणीमध्ये सुधीर मुनगंटीवारांचा मोठा वाटा आहे. मुनगंटीवारांचे राजकीय कौशल्य पाहून 2009 साली त्यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. 2013 पर्यंत त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये मोठे बदल करण्यात आले आणि त्याचा परिणाम पुढच्याच वर्षी म्हणजे 2014 साली दिसून आला. त्यावेळी भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि पहिल्यांदाचा भाजपचा मुख्यमंत्री राज्याला लाभला हे सत्य कुणी नाकारू शकतं नाही, विशेष म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात काम करायचे पण आज दिवस फिरले आणि ज्यांनी भाजप पक्षाला संघटनात्मक उभारी देऊन सत्तेच्या तख्तापर्यंत पोहचविले त्यांनाच सत्तेतून बेदखल करण्यात आले जे केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेलाचं नव्हे तर एक अभ्यासू आणि प्रखर वक्ता असलेल्या मुंगनटीवार यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने महाराष्ट्रातील जनतेला पटलं नाही ही वस्तुस्थिती आहें.

कडवट मराठी म्हणून आक्रमक.

राज्यात हिंदी भाषा सक्तीचा करण्याचा सरकारचा डाव हा मनसे उबाटा शिवसेने हाणून पाडला आणि सरकारला आपले दोन विधेयकं मागे घ्यावे लागले, दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात धारेवर धरले तें विधानसभेत कडाडले की इकडे मराठी भाषेला अभिजात करायची आणि दुसरीकडे विधिमंडळाची कामकाज पत्रिका इंग्रजीत करायची हे आम्ही खपवून घेणार नाही त्यांनी सरकारला प्रश्न केला की मराठी अभिजात भाषा असतांना कामकाज इंग्रजीत का छापता? यावरून सुधीर मुनगंटीवार मराठी भाषेविषयी किती कडवट आहें हे स्पष्ट होते.

गोरगरीबांचा, शेतकऱ्यांचा नेता म्हणून मिळवीला सन्मान.

सत्ता मिळाली की नेते कसे सैराट होतात हे नेहमीच दिसत असतें, पण सत्ता असतांना कधी सत्तेचा माज न करणारे मुनगंटीवार आता सर्वसामान्य गोरगरीब, शोषित पिडीत व तरुण बेरोजगार शेतकऱ्यांचे नेते झाले आहें, स्वतःच्या सरकारला प्रश्न करून प्रसंगी आक्रमक होऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा पर्यन्त निश्चितच एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांचा सन्मान वाढविणारा आहें, पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय घेऊन व आकड्यानिशी सरकारला कर्जमाफी कशी करू शकतो हे पटवून देऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि सरकारच्या नितीचा विरोध करत मुनगंटीवार यांनी सरकार ला धारेवर धरले,

शेतकऱ्यांची केवळ कर्जमाफी व्हायला नको तर त्यांना शेतीसाठी आवश्यक उपाययोजना सरकारने कराव्या यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या सोलर पम्प च्या तक्रारी ची सोडवणूक करण्यासाठी सरकारला भाग पाडले, त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान रानडुक्कर करतात त्या रानडुक्करांना मारण्याची अनुमती मिळविली व या रानडुक्करामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत होते तेंव्हा हेक्टरी 10-15 हजार रुपये नुकसान भरपाई मिळायची ती आता 50 हजार करण्यात आली आहें, त्यांनी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बोनस मिळवून दिले आहें.

सिडीसीसी बैंकेच्या कोट्यावधीच्या नोकर भरतीची एसआयटी चौकशी l.

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात सगळे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या कोट्यावधी भ्रष्टाचारात तल्लीन होऊन मागासवर्गीय एससी, एसतटी व ओबीसी चे आरक्षण नोकर भरतीत संपवले असतांना बघ्याच्या भूमिकेत असतांना आमदार सुधीर मुनगंटीवार हे एकमेव लोकप्रतिनिधी मनसे आणि अनेक राजकीय सामाजिक संघटनानी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देतं विधानसभेत गरजले आणि एसआयटी चौकशी लावण्यास सरकारला भाग पाडले, त्यामुळे आता या बैंकेत झालेली नोकर भरती रद्द होऊन हजारो हुशार तरुण बेरोजगारांना सिडिसिसी बैंकेत नोकरी मिळेल ही आशा निर्माण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here