Home चंद्रपूर इशारा :- ग्राहकांना सूचना न देता बँक ऑफ महाराष्ट्र टेंभुर्डा शाखेचे स्थलांतरण...

इशारा :- ग्राहकांना सूचना न देता बँक ऑफ महाराष्ट्र टेंभुर्डा शाखेचे स्थलांतरण थांबवा.

मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची जिल्हाधिकारी यांचेसह बैंकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे मागणी.

वरोरा/चंद्रपूर :-

वरोरा तालुक्यातील ग्रामीण स्तरावर टेंभुर्डा ही मोठी बाजारपेठ असून इथे जवळपास 35 तें 40 गावाचे लोकं बाजार करण्याकरिता येतात व या गावात बैंक ऑफ महाराष्ट्र ची शाखा असून या बैंकेत टेंभुर्डा गाव परिसरातील किमान 10 हजार ग्राहकांचे बचत खाते, चालू खाते, आवर्ती ठेव खाते, आणि मुदत ठेव खाते आहें, महत्वाची बाब म्हणजे बचत गटातून महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या जवळपास 500 महिला बचत गटाचे खाते इथे असून त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असतें, मात्र बैंकेच्या कोणत्याही ग्राहकांना कुठलीही पूर्व सूचना न देता बैंक ऑफ महाराष्ट्र टेंभुर्डा शाखेचे स्थलांतरण वरोरा परिसरात होत असल्याचा निर्णय जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर झाल्याचा बैंक व्यवस्थापकांनी ग्रामपंचायत टेंभुर्डा यांना सूचना पत्राद्वारे कळविला आहें, या निर्णयामुळे टेंभुर्डा शाखेचे हजारो ग्राहक संतापले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांचेसह बैंकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे निवेदने देऊन बँक ऑफ महाराष्ट्र टेंभुर्डा शाखेचे स्थलांतरण वरोरा येथे होतं असल्याने तें थांबवा अन्यथा अन्यथा सगळ्यां ग्राहकांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहें. यावेळी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनाहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबाँधे, सुनील गुढेइत्यादीची उपस्थिती होती.

टेमुर्डा या बाजारपेठ असलेल्या गावात एकच राष्ट्रीयकृत बैंक आहें व या बैंकेचे एटीएम आहेत, मात्र या एटीएम मधून पैसे चोरण्याचा प्रयत्न अनेकदा चोरट्यानी केल्यामुळे ही बैंक शाखा वरोरा शहरांलगत करण्याचा निर्णय बैंकेच्या मुख्यालयी झाल्याची माहिती बैंक व्यवस्थापक देतं आहें, मात्र ह्या एका एटीएम मधून होत असलेल्या चोरीमुळे हजारोच्या संख्येने असलेल्या बैंक ग्राहकांना यामुळे उगाच 12 किलोमीटर पायापीट करावी लागत असेल व त्यांना आगाऊचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असेल तर बैंक व्यवस्थापन ग्राहकांवर अन्याय करत आहें, कारण एटीएम ची सुरक्षा करण्याचे काम हा बैंकेचा अंतर्गत प्रश्न आहें त्याचा भुर्दंड हा ग्राहकांवर पडता कामा नये, कारण बँक मुनाफा कमावते तर तो बैंक ग्राहकांच्या माध्यमातून कमावते त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या अधिकारापासून वंचीत ठेवण्याचे काम बैंक ऑफ महाराष्ट्र करताहेत जो एक प्रकारे ग्राहकांवर अन्याय आहें आणि कुठल्याही नियमाला धरून नाही,

या बैंकेत ग्रामीण क्षेत्रातील 500 महिला बचत गटांचे बैंक खाते असून या माध्यमातून जवळपास 5-10 हजार महिलांना अर्थसाहाय्य मिळतं असतं, ही बैंक स्थलांतरण झाली तर संजय गांधी निराधार योजनाच्या लाभार्थी वृद्धांना नाहक त्रास होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहें, छोटे दुकानादर यांना बैंक खात्यात पैसे टाकण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागेल आणि बैंकेच्या ग्राहकांना त्रास देण्याचा अधिकार हा बैंकेच्या व्यवस्थापनाला आणि त्यांच्या मुख्यालयाला नाही कारण ही बैंक ग्रामीण लोकांच्या आर्थिक जमापुंजीची अर्थवाहिनी बनली आहें कारण येथील एटीएम मुळे तात्काळ पैसे काढण्याची मुभा येथील ग्राहकांना मिळताहेत हा त्यांचा अधिकार आहें. त्यामुळे तात्काळ या प्रश्नावर निर्णय करावा व टेमुर्डा येथून वरोरा शहरालगत स्थलांतरण होत असलेल्या बैंकेच्या वरिष्टाचा निर्णय रद्द करून बैंक ऑफ महाराष्ट्र ची टेमुर्डा शाखा तिथेच राहिलं असा ग्राहकांच्या हिताचा निर्णय आपण द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या परिसरातील हजारो बैंकेच्या ग्राहकांना घेऊन बैंक प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करेल त्या दरम्यान कायदा सुव्यवस्था मोडल्या गेल्यास आपले प्रशासन जबाबदार राहिलं, असा इशारा मनसे तर्फे देण्यात आला आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here