आता नकोत नव्या लाडक्या बहिणी, ३१ हजार अर्ज बाद, नवी नोंदणी बंद
पोर्टल बंद असल्याने वाढल्या अडचणी : १ वर्षातच बदलवले निकष
चंद्रपूर :- निवडणुकीपूर्वी शासनाने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना राबवत दीड हजार रुपयांची ओवाळणी देण्यास सुरुवात केली. मात्र, या योजनेला वर्ष उलटण्यापूर्वीच अर्ज नोंदणीचे पोर्टल बंद करण्यात आले. एवढेच नाही तर विविध कारणांनी पूर्वी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीचे अर्ज बाद करण्यासही सुरुवात केली आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल ३१ हजार ८९१ अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आपण सरकारसाठी लाडक्या बहिणी आहोत की नाही, असा प्रश्न हिरमुसलेल्या लाडक्या बहिणींना पडला आहे. जून २०२४ मध्ये सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. दरम्यान, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला लाभासाठी पात्र ठरल्या होत्या. नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक होईपर्यंत योजनेच्या लाभांसाठीची नोंदणी धूमधडाक्यात सुरू राहिली. दरम्यान, निकषांच्या पूर्ततांची फारशी काटेकोर छाननी न करता महिलांना पात्र ठरवले. मात्र, आता वेगवेगळे कारण समोर असून पूर्वी पात्र केलेल्या लाडक्या बहिणींना बाद करण्याचा सपाटा सरकारने सुरू केला आहे.
तालुकानिहाय बाद करण्यात आलेले अर्ज
तालुका
सिंदेवाही १४०3
कोरपना २११८
वरोरा २२९०
बल्लारपूर १२४४
नागभीड २२५४
ब्रह्मपुरी ४४०९
गोंडपिपरी १११०
राजुरा १५५२
पोंभुर्णा ५४५
चंद्रपूर ५८११
मूल १५६५
सावली १७५८
चिमूर ३३३९
भद्रावती १५३१
जिवती ९७२
लाभार्थ्यांची एकूण संख्या
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत चार लाख ९२ हजार ९५१ महिलांनी अर्ज केले. त्यापैकी चार लाख ६१ हजार ६० अर्जाना मान्यता मिळाली आहे.
अर्ज बाद होण्याची प्रमुख कारणे कोणती ?
अतिरिक्त उत्पन्न, सरकारी नोकरी, दुहेरी योजनांचा लाभ अशा अनेक कारणांनी महिलांन वगळण्यात आले आहे.
अनेक महिलांच्या आर्थिक सधनतेची छाननी करून शासकीय स्तरावरूनच त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
काही महिलांकडे चारचाकी वाहन आढळले, त 3 काही सरकारी नोकरीत लागल्या, त्यामुळे त्यादेखील वगळण्यात आल्या आहेत.
किती महिलांनी स्वतःहून सोडला लाभः
लाडक्या बहीण योजनेतून एकूण बाद झालेल्या ३१ हजार ८९१ लाडक्या बहिणींपैकी १२८ महिलांनी स्वतःहून योजनेचा लाभ सोडून मन मोठे केले आहे. योजनेचा लाभ नको असल्याची त्यांनी महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांकडे पत्र दिले आहे.
सरकारी नोकरी, अतिरिक्त उत्पन्न, दुहेरी योजनांचा लाभ अशा अनेक कारणांनी वरिष स्तरावरून अर्ज वगळण्यात येत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातून ३१ हजार ८९१ अर्ज वगळण्यात आले आहेत. यात १२८ स्वतःहून लाभ सोडलेल्या महिलांचा समावेश आहे.
– मिनाक्षी भस्मे, जिल्हा हिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर
सप्टेंबर महिन्यापासून अर्जाची नोंदणी बंद
गेल्या विधानसभा निवडणुकीपासून म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून योजनेचे पोर्टल पूर्णतः बंद आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या महिलांना लाभासाठी अर्ज करण्यास अडचण येत आहे.