Home Breaking News सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ‘मैत्रेय ग्रुप’ गुंतवणूकदारांना मिळणार न्याय!

सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ‘मैत्रेय ग्रुप’ गुंतवणूकदारांना मिळणार न्याय!

सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ‘मैत्रेय ग्रुप’ गुंतवणूकदारांना मिळणार न्याय!

चंद्रपूर, दि. १६ जुलै २०२५: २०१७ पासून ‘मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनी’मध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरिब गुंतवणूकदारांना अखेर न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात सतत पाठपुरावा करणारे भाजपचे आदिवासी महामंत्री आणि समाजसेवक शुभम गेडाम यांच्या अथक प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

शुभम गेडाम यांनी मुंबई मंत्रालयात मंत्री, DGP तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे नाव गुंतवणूकदार जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णायक लढा दिला. विशेष म्हणजे, चंद्रपूरचा यादीत उल्लेख नसतानाही मैत्रेय ग्रुपमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारा जिल्हा चंद्रपूरच ठरला आहे. त्यामुळे आता चंद्रपूरचे नाव प्रथम क्रमांकावर घेण्यात आले आहे.

या सगळ्या लढ्याच्या मागे आदरणीय आमदार, अभ्यासू लोकनेते, विकासपुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. शुभमभाऊ गेडाम यांनी सतत त्यांच्याशी संपर्कात राहून या प्रकरणाचा पाठपुरावा केला. अखेर, पावसाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री यांच्यासमोर हा मुद्दा ठामपणे मांडत गोरगरिब जनतेचे पैसे लवकरच परत मिळतील अशी ग्वाही मिळवली.

या विजयामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला असून, शुभम गेडाम आणि सुधीर मुनगंटीवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

– मैत्रेय घोटाळ्यातील ऐतिहासिक न्यायासाठी शुभम गेडाम यांचा लढा प्रेरणादायक ठरत आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here