मोठ्या प्रमाणात मद्यप्रेमींच्या खिशाला भगदाड पडत असल्यामुळे बहूतेकांची बाईनं शॉपी मधूनच खरेदी, चंद्रपूर जिल्ह्यात बनावट दारूचा नवा ट्रेंड,
चंद्रपूर :-
शासनाच्या मद्य विक्रीच्या माध्यमातून भरमसाठ कर वसुलीच्या धोरणामुळे बिअर बार व हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून त्याविरोधात लढा देण्याचा निर्णय बार संचालकांनी घेतला असल्याची माहिती आहे, येत्या दहा दिवसांत सरकारने अन्यायकारक मूल्यवधित कर (व्हॅट) रद्द न केल्यास विदर्भातील सर्व बार चालक आपले व्यवसाय बेमुदत बंद ठेवतील, असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.
राज्य शासनाने मद्य विक्रीवरील व्हॅट ५ टक्क्यांवरून १० टक्के, परवाना शुल्कात १५ टक्के आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर (आयएमएफएल) उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. विदर्भातील सर्व जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नागपूर येथे घेण्यात आली. १० टक्के व्हॅट हा फक्त बार चालकांवरच लादला गेला. मद्याच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 560 बिअर बार व त्यावर अवलंबून असणाऱ्या 20 हजार कुटुंबियांवर तर अमरावती जिल्ह्यातील ४०० बार व त्यावर अवलंबून असलेल्या १५ हजार कुटुंबीयांवर बेकारीची वेळ आली असल्याची बाब समोर आणण्यात आली आहे.
अजित पवारांचे हात वर?
केवळ बार चालकांवरच लादलेला व्हॅट रद्द करावा या मागणीसाठी सरकारकडे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदने देऊनही व्हॅट रद्द केला नाही. मद्यविक्री दुकानामधून मद्याच्या बाटल्या विकत घेऊन रस्त्यावर, धाब्यांवर, हातगाडींवर मद्य सेवन करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाईन शॉपची विक्री तिपटीने तर देशी दारूची विक्री २० टक्क्यांनी वाढली आहे. तसेच हातभट्टी, नकली दारू, परराज्यातून तस्करी करून येत असलेल्या दारूचा महापूर आला आहे त्यामुळे वाढविलेल्या व्हॅट रद्द करा अशी मागणी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नितीन मोहोड यांनी शिष्ठमंडळासह भेट घेऊन हा प्रश्न समाजावून सांगितला तरीही सरकार काहीच करायला नाही..
बल्लारपूर मधील मिलिंद ट्रेडिंग वाईन शॉप मध्ये सापडली बनावट दारू?
एकीकडे दारूचे दर वाढवून बिअर बार चे धंदे संपविण्याचा डाव रचला जातं असताना दुसरीकडे मात्र बनावट दारू चक्क वाईन शॉप मध्ये मिळतं असेल तर ही गंभीर बाब आहे आणि मिलिंद ट्रेडिंग कंपनीच्या दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली आहे. त्या धाडीमध्ये, ४८ पेट्या बनावट देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी भागीदार पवन जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे,