मनसे कामगार जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमात मनसेचे पदाधिकारी यांची उपस्थिती. व्हिडीओ नक्की बघा..
चंद्रपूर /राजुरा :-
जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून होत असतांना व त्यासाठी पक्षाच्या बैठकीचे आयोजन ग्रामीण क्षेत्रात सुरू आहे, त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मागे नसून ग्रामीण क्षेत्रात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे यांचे जिल्हा दौरे सुरू आहे, त्यातच राजुरा तालुक्यातील गोयेगाव व आजूबाजूच्या परिसरातील गावामधून आलेल्या युवकांनी दिनांक 25 ऑगस्ट रोज सोमवारला गोयेगाव येथील हनुमान मंदिर परिसरातील खुल्या मैदानात मनसेत प्रवेश केला. यावेळी गोयेगाव गावातील आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य यासंह माजी पोलीस पाटील उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा भद्रावती या क्षेत्रात मनसेचा प्रभाव असल्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिले तर जिल्हापरिषद मध्ये मनसेचं खातं खुलू शकतं, त्यामुळे मनसेच्या दुसऱ्या फळीतील सर्व मनसे पदाधिकारी हे कामाला लागले आहे व त्यात धर्तीवर राजुरा तालुक्यातील गोयेगाव येथे शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश करण्यात आला, यावेळी सर्व मनसे पदाधिकारी यांनी उपस्थित महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन करून पक्ष संघटनेला मजबूत करण्याचे व स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून आणण्याचे आवाहन केले..