मनसे जनहीत शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी 28 ऑगस्टला दिले होते पूल दुरुस्ती संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन..
चंद्रपूर:-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या अधीनस्त येणाऱ्या झरपट नदीचा पूल बांधून काही वर्षचं झाले असताना त्या पुलाला भेगा पडल्याचे लक्षात येताच व तो धोकादायक पूल कधीही पडून जिवहानी होण्याची भीती लक्षात घेता चंद्रपूर मनसे जनहित विभाग शहर अध्यक्ष पियुष धुपे व त्यांचे सहकारी जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूरक्याल इत्यादीनी मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन त्या धोकादायक पूलाची त्वरित दुरुस्ती करावी व तो पूल बांधणाऱ्या कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण जनहीत सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला होता, दरम्यान आयुक्तानी चौकशीचे आदेश दिले होते, मात्र दिनांक 28 ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त यांना निवेदन दिले असतांना अगदी चार दिवसातच तो पूल खचला असल्याचे धक्कादायक चित्र समोर आल्याने मनपा प्रशासन खळबळून जागे झाले आहे, दरम्यान मनसे जनहीत कक्ष विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः पुलाची पाहणी करून त्या पूल बांधणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते त्यात झरपट नदीवरील पुलिया हा पडून केव्हाही वाहून जाऊन मोठा अपघात होऊ शकतो. आपण या कडे गांभीर्याने लक्ष देउन काम कराव असं नमूद केलं होतं, मात्र आयुक्त व मनापा शहर अभियंता वा कोणत्याही अधिकारी यांनी लक्ष न देता दुर्लक्ष केले. दरम्यान काल हा झरपट नदीवरील धोकादायक पूल काल पाण्यात वाहून घेतल्याने मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, मनपा प्रशासनाच्या या भ्रष्ट नितिमुळे शहरातील जनतेला वेठीस धरणाऱ्या मनापा आयुक्ताचा मनसे तर्फे निषेध करून मनपा प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जनहीत कक्ष विभाग पियुष धुपे यांनी दिला आहे.