Home चंद्रपूर सावधान :-भारतात जर तिसऱ्या टप्प्यात कोरोना पोहचला तर जाणार लाखों लोकांचा जीव...

सावधान :-भारतात जर तिसऱ्या टप्प्यात कोरोना पोहचला तर जाणार लाखों लोकांचा जीव !

कोरोना व्हायरसने प्रगत देश हतबल,१८ हजार पेक्षा जास्त लोकांचा गेला जीव,

कोरोना वार्ता :-

कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना जिथे हतबल केले आहे व सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने पुन्हा वाढत असल्याने विश्वात चिंतेचे सावट गडद होताना दिसत आहे. त्यातच जर भारतातील जनतेने खबरदारी घेतली गेली नाही तर भारतात अपुऱ्या आरोग्य सुविधा व अत्याधुनिक टेस्टिंग मशीन्स यामुळे तिसऱ्या टप्प्यात जर कोरोना पोहचला तर इथे लाखों लोकांचा जीव जावू शकतो एवढा भयंकर हा व्हायरस आहे.

या व्हायरस पासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर एक-दुसऱ्या पासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीच आव्हान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉक डाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.

जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 18,892 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 4,22,614 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,08,879 लोक बरे झाल्याची माहिती सुद्धा मिळत आहे.

यापैकी चीनमध्ये 3,281, इटलीत 6, 820 अमेरिकेत 775, इराणमध्ये 1,934, स्पेनमध्ये 2,991, जर्मनीमध्ये 159, फ्रान्समध्ये 1,100 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 536 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जागतिक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसमुळे इटलीत हाहाकार माजला आहे. चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. आतापर्यंत इटलीत 6 हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे जर जगात दुसऱ्या क्रमांकाच्या आरोग्य सुविधेसाठी प्रख्यात इटली देशाची ही परिस्थिती असेल तर भारताचा क्रमांक तर १०२ आहे, मग भारताची काय हालत होईल ? त्यामुळे भारतातील नागरिकांनी आता स्वरक्षणासाठी घराबाहेर येऊ नये हाच सर्वात मोठा पर्याय आपल्यापुढे असल्याचे सर्व डॉक्टर्स ओरडून सांगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here