Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग कंपन्या सुरूच . सहायक कामगार आयुक्त लोया...

धक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग कंपन्या सुरूच . सहायक कामगार आयुक्त लोया यांचे दुर्लक्ष

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला संपविण्यासाठी शासन प्रशासन व वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली? सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी केली कारवाईची मागणी !

जिल्हा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक पॉवर प्लांट, विविध कारखाने, पेपरमिल, स्पाँज आयर्न प्लांट, कोळसा खाणी व त्यावर आधारित इतर छोटे मोठे उद्योग आहे, ह्या सर्व उद्योगात लाखो कामगार सेवा देण्याचे काम करीत असून सध्या कोरोना या महाआजाराने संपूर्ण जगामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. व आतापर्यंत ह्यावर कुठल्या प्रकारचे उपचार होण्याकरिता औषधीच तयार झालेली नाही म्हणून देशातील संपूर्ण राज्यात व इतर जिल्ह्यातील लोकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे, संपूर्ण शासकीय व अशासकीय कार्यालयात फक्त 5.टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याचे शासन प्रशासनाने संपूर्ण देश स्थळावर आदेश दिले असून अनेक राज्याच्या प्रमुख विभागाने आपल्या विभागाला अशा प्रकारचे निर्देश देऊन मुख्यालयात हजर राहण्यासाठी सक्ती केली आहे परंतु मागील 2 महिन्यापासून सहाय्यक कामगार आयुक्त लोया हे चंद्रपूर या मुख्यालयात राहत नाहीच शिवाय दोन वर्षांपासून मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता नागपूर येथे राहतात त्यामुळे स्थानिक परिस्थितीशी त्यांना काही देने घेणे नाही ही बाब सर्वांच्या लक्षात आली आहे, या महिन्यात दोन ते तीन वेळा आले आहे आणि आता सध्या मागील अनेक दिवसापासून अशा बिकट परिस्थितीत मुख्यालयात हजर नाही, चार ठिकाणचे चार्ज असल्याचे सांगून एकही ठिकाणी ते राहत नाही,
कोरोना आजरावर मात करण्यासाठी शासनाचे अनेक प्रयत्न सुरू असताना व याबाबत सचिव, कामगार आयुक्त यांनी विशेष आदेश काढले आहे व जिल्हाधिकारी यांनी देखील आदेश जारी केले आहे परंतु त्याची अंमलबजावणी लोयासारखे बेजबाबदार अधिकारी असल्याने होताना दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील सरसकट 75 टक्के उद्योग कंपन्यांमध्ये काम सुरू आहे, त्यासाठी कोणतेही पत्रक लोया यांनी त्या कंपन्यांना अजूनही पाठविले नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना कारखानदारांना देण्याचे काम स्थानिक पातळीवर काम करणाऱ्याचे आहे, कंत्रातदारांशी असलेल्या अर्थप्रेम संबधामुळे ते वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नाही त्यामुळे त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे, यामुळे सर्व कारखाने कामगारांना सुट्टी न देता त्यांना राबवून घेत आहे, त्यामुळे जिल्यातील कामगार वर्गात स्थनिक चंद्रपूर कामगार कार्यालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा शुन्य दरावर आहे अर्थात चंद्रपूर कामगार विभाग हा कंत्राटदारांनी व कंपन्यांनी विकत घेतला असल्याची खुली चर्चा आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना विचारणे सोडून दिले आहे, बेशिस्त कारभारामुळे कामगार विभागाची फार मोठी बदनामी होत आहे, शासनाचे प्रशासनाचे कोणतेही आदेश न मानता
कंत्रातदाराचे हस्तक म्हणून काम करणाऱ्या व कारखाने असेच सुरू ठेवून आजार किंवा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई न केल्यास आतापर्यंत हजारो कामगारांना याचा संसर्ग झालेला असण्याची शक्यता आहे व यामुळे हा आजार थांबण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे , याकडे वरिष्ठ कामगार अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे आणि जिल्ह्यात होत असलेल्या या संपूर्ण बाबीला जिल्हा कामगार प्रशासनाचे प्रमुख अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी अनेक राजकीय पक्षांकडून, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, कामगार मंत्री कामगार सचिव, मुख्य आयुक्त कामगार मुंबई यांच्याकडे होत आहे तरी शासन प्रशासनाने सदर बाबीवर गंभीरपणे लक्ष देऊन संपूर्ण उद्योग कंपन्यांमधील काम बंद करावे अशी मागणी होतं आहे.

Previous articleवरोरा तालुक्यातील पिजदुरा गावाकमेटीचा गावकऱ्यांना आदेश, बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश नाही !
Next articleसावधान :-भारतात जर तिसऱ्या टप्प्यात कोरोना पोहचला तर जाणार लाखों लोकांचा जीव !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here