Home वरोरा वरोरा तालुक्यातील पिजदुरा गावाकमेटीचा गावकऱ्यांना आदेश, बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश नाही !

वरोरा तालुक्यातील पिजदुरा गावाकमेटीचा गावकऱ्यांना आदेश, बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश नाही !

पाहुणे आलेच तर सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांना कळवा !

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिजदूरा या गावात एक मोठा निर्णय झाला असून जगात कोरोना विषाणूने थैमाण घातले आहे त्या बीमारी पासुन गावाचा बचाव करण्यासाठी सावधानतेच्या द्रुष्टीने गावात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश नाही आणि जर कोणी पाहुणा म्हणून गावात आलाच तर आगोदर सरपंच पोलिस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांना कळवावे असा ईशारा सर्व गावकऱ्यांना देण्यात आलेला आहे.
गावातील सरपंच, पोलिस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष या कमेटितील सदस्यांनी एक पत्रक काढून गावकऱ्यांना सूचित केले आहे त्या पत्रकात खालील बाबी नमूद आहे,

१.आपल्या गावात बाहेर गावून आलेल्या पाहूण्याना किंवा लोकांना आपल्या घरी येण्यास टाळावे तसे न ऐकल्यास पोलिस पाटील,सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष यांना कळविण्यात यावे उदा.मुबई पुणे बाहेर जिल्हातून तसेच इतर राज्यातून प्रवास करून आलेल,परदेशातून प्रवास करून आलेले व्यक्ती किंवा लोक आढल्यास संपर्क साधावा.

२ कोणत्याही प्रकारचे सामुदाईक कार्यक्रम करून गर्दी करू नये तसे आढळल्यास जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार योग्य ति कार्यवाही करण्यात येईल.उदा सांस्कृतीक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम,वाढदिवस,लग्न सोहळा,भजन, ३. राज्य शासनाने कोरोना विषाणू कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोगप्रतीबंधक कायदा १८९७ दिनाक १३/०२/२०२० पासुन लागु केलेला असुन चंद्रपूर जिल्हा फौजदारी प्रक्रिया सहित १९७३ चे कलम १४४(१)(३)अन्वये आदेश काढ्यात आलेला आहे. त्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकानी घोडका किंवा गर्दी करू नये असे आवळल्यास पोलीस निरीक्षक शेगाव यांना काळ विण्यात येईल उदा. ३ते ५ व्यक्ती एकत्र राहू शकत नाही.

४.गावातील सुजान, सुशिक्षीत नागरीक गावातील महिला पुरूष, लहान मुले, मुली विणाकारण गावाबाहेर पडू नये अत्यआवश्यक कामासाठीस बाहेर गेल्यास मास्क रूमाल सॅनिटायझर इ.

वापर करावा. विनाकारण बाहेर जावू नये. विनाकारण कोणी बाहेर गेल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल उदा.अंत्यत जिवना आवश्यक काम . दवाखना मेडीसिन राशन आणि किराणादुकान ५.बहिरून आल्यानंतर हात साबनाने स्वच्छ २० सेकंद धुवावे कोरोना रोगाचे लक्षणे, शर्दी खोकला ताप,असे आढळल्यास वैद्यकिय अधिकारी वरोरा याच्याशी ०७१७६-२८२७२१ या नंबर कॉल करावा,

६ गावात बाहेर गावून आलेल्या व्यक्तीची माहीती लपवल्यास ज्या घरी तो पाहूणा म्हणून राहील त्या व्यक्तीवर व घरमालकावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल ७. दुकानात कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये दुकात ४ ते ५ व्यक्ती एकत्र उभे किंवा बसून असल्यास कलम १४४ नुसार दुकानात एकत्र उभे व बसुन असलेल्या व्यक्ती व दुकानदाराव योग्य कार्यवाही करण्यात येईल.

८, १४ एप्रिल २०२० पर्यंत ही बदी लागू राहील पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू राहील

९ कोरोणा बाबत काही समस्या असल्यास खालील व्यक्तीशी संपर्क साधावा

१ श्री प्रकाश सोयाम सरपंच – ९८५०७५२९७९ २ श्री.प्रविण मडावी पोलीस पाटील-८३७९८०७२०४ श्री मनोज गेडाम तं अध्यक्ष-८९९९१६०६८७

Previous articleखतरनाक :- लोकांना घरात बंद ठेवण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी ८०० वाघ-सिंह रस्त्यावर सोडले ?
Next articleधक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग कंपन्या सुरूच . सहायक कामगार आयुक्त लोया यांचे दुर्लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here