भारतातील परिस्थिती पाहता भारतात सुद्धा लोकांना घरी राहण्यासाठी कुठला तरी भयंकर प्रयोग करण्याची गरज !
कोरोना अपडेट :-
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. अनेक देशांमधील शहरे आता लॉकडाउन झाली आहेत. दरम्यान, एक रशियन संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन कोरोना व्हायरसमुळे लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करीत आहेत, परंतु लोक या गोष्टीसाठी सहमत नाही. म्हणून त्यांनी तेथील रस्त्यावर ८०० सिंह आणि वाघ सोडले आहेत, आता तीच परिस्थिती भारतात असून भारतातील लोक त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडत असल्यामुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता बघता आता भारतात सुद्धा भयंकर भिती दाखवून त्यांना घरीच राहण्यास मजबूर करण्याची गरज असल्याचे बोलल्या जात आहे,
रस्त्यावर ८०० वाघ आणि सिंह सोडल्याचा पुतिन यांचा हा संदेश वेगवेगळ्या सोशल मीडियावर जंगलातील आगीसारखा पसरत आहे. लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे शेअर करत आहेत. ट्विटरवर, एका व्यक्तीने हा संदेश शेअर करुन लिहले की, पुतिन यांनी रशियाच्या लोकांना दोन पर्याय दिले, एकतर ते दोन आठवडे घरात राहिल किंवा 5 वर्षे तुरूंगात. याशिवाय पर्याय नाही. लोकांनी घरातून बाहेर पडू नये म्हणून त्यांनी ८०० सिंह आणि वाघ रस्त्यावर सोडले आहे.