Home Breaking News मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाला लागले ग्रहण ? कोरोना व्हायरसच्या भितीने २१ दिवसांच्या...

मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाला लागले ग्रहण ? कोरोना व्हायरसच्या भितीने २१ दिवसांच्या संचारबंदीतून देशाच्या अर्थव्यवस्थेचा होणार बट्ट्याबोळ ?

 देशातील जनतेला घरातच राहण्याचे आव्हान केले पण त्यांना दोन वेळेच्या जेवणाचे काय ? याचे उत्तर नाही,

लक्षवेधी :-

आपल्या देशात कोरोनाचं संकट पुढे ठाकलं आहे. हा कोरोना व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरत आहे की, तैयारी करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. व पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार आहे असेही त्यांनी जाहीर केले,

खरं तर आता देशावर कोरोनाचे संकट आहे आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जनतेने सरकारला आणि सरकारी यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे, पण हे संकट कसे काय ओढवले ? जेंव्हा शेजारी राष्ट्र असलेल्या चिनमधे कोरोना व्हायरस पसरत होता तेंव्हा आपल्या पंतप्रधानांच्या अधिनस्त असणाऱ्या गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या ? काय त्यांना हा व्हायरस आपल्या देशात येणार आणि आपली परिस्थिती बिकट होणार असे वाटले नाही कां ? महत्वाची बाब म्हणजे कोरोना हा व्हायरस भयंकर असून त्याचा प्रादुर्भाव झाल्यास व तो तिसऱ्या टप्प्यात गेल्यास परिस्थिती हाताबाहेर जाते हे भारतीय वैद्यकीय एक्सपर्टना वाटलं नसेल कां ? असे अनगिनत प्रश्न सर्व देशबांधवांना पडत आहे.परंतु आपल्या पंतप्रधानांना या सर्व भानगडीत पडायचेच नव्हते कारण त्यांना मध्यप्रदेश मधे काँग्रेसचे सरकार पाडून भाजपचे सरकार बनवायचे होते. त्यासाठी काँग्रेसमधे फूट पाडून बहुमत शीद्ध करायचे होते. यश बँक घोटाळा लपवायचा होता, एवढंच काय शाहीन बाग मधे चाललेले डिसेंबरपासूनचे आंदोलन तुडवायचे होते, आणि म्हणूनच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना चिन मधील कोरोना व्हायरसचा संभावित धोका समजूनच घ्यायचा नव्हता.
या देशात जेव्हापासून नरेन्द्र मोदी सरकार अस्तित्वात आले तेव्हापासून या देशाला जणू ग्रहण लागले आहे, कारण मोदी हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले पंतप्रधान आहे ज्यांनी प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांच्या प्रश्नांना कधीच पत्रकार परिषद घेवून उत्तर दिले नाही, आणि ही बाब जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलर सारखी आहे कारण त्यांनी सुद्धा कधीही प्रसारमाध्यमांना उत्तरे दिली नाही तर उलट प्रसारमाध्यमांमधे आपलाच उदोउदो होईल अशा प्रकारचे चित्र त्यांच्याकडून उभे करण्यात आले,  अगदी अशीच परीस्थिती पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची असून सन २०१६ मधे केलेली नोटाबंदी असो की देशात लावलेली जीएसटी असो, त्यांच्या निर्णयाने देश आर्थिक द्रुष्टीने खड्ड्यातच गेला आहे, विरोधी पक्षात असतांना नरेन्द्र मोदी म्हणाले होते की डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर होतो कसा ? केवळ रुपया कमजोर होतं नाही तर त्या देशाची अस्मिता कमजोर होतं असते आणि जेंव्हा नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाले तेंव्हा काँग्रेसच्या काळात असलेला ६५ रुपये डॉलर हा १०१८ मधे तब्बल ७४ रुपयावर गेला म्हणजे मोदींनी देशाची अस्मिता कमजोर केली आणि आता तर तो ७६ रुपये पर्यंत आला. परंतु तरीही पंतप्रधान मोदी हे खरे राष्ट्र पुरुष अशी त्यांची परिभाषा प्रसारमाध्यमांनी उभी केली आहे, मोदींच्या काळात नोटाबंदी नंतर देशातील ६ लाख ५० हजार ऊद्दोग बंद झाले यामधून जवळपास ४ कोटी ५० हजार लोकांचे रोजगार गेला, शेतकऱ्यांना उत्पादन मूल्यांच्या दीडपट हमी भाव देणारे मोदी शेतकर्याना वाऱ्यावर सोडतात, दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे स्वप्न म्हणजे बेरोजगाना एखाद्या कार्यालयापढ़ें पकोडे विकण्यासाठीचा हा रोजगार ठरला आहे, प्रत्तेकाच्या बैंक खात्यात १५ लाख रुपये तर तर छू मंतर झाले, या सर्व गोष्टीचे विवेचन जर केले तर मोदींनी जनतेला केवळ भूलभूलय्या केले आणि हा देश अंबानी अदानी या सारख्या संस्थानाच्या हातात दिला अशी परिस्थिती आहे, परंतु हे बोलण्याचं धाडस सध्याच्या प्रसारमाध्यमांकडे नाही कारण त्यांनी सरकार विरोधात काही लिहिले किंव्हा प्रसारित केले की त्याचेवर कारवाई होणार, त्यांना खोट्या  पोलिस केसमधे अडकवले जाणार, अर्थात हे सर्व ॲडॉल्फ हिटलर च्या धर्तीवर होतं आहे, पण आपल्या देशातील जनता ही अंधविश्वासू आणि भोळी आहे, त्यांना कुटील डाव आणि राजकारण्यांचे डाव कळत नाही आणि म्हणूनच आपली लोकशाही धोक्यात आहे.

नरेन्द्र मोदी यांनी देशातील जनतेला उद्देशून जे भाषण केले ते अगदी नोटाबंदीच्या वेळी केले अगदी तसेच होते, उपाययोजना काही नाही, फक्त घोषणा करायला ते समोर आले होते, ते म्हणाले की प्रगत राष्ट्रांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. याला थोपवायचे असेल तर आपल्याला गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय आहे. आपल्याला हे लक्षात आले नाही तर आपल्याला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. पण त्यांनी हे नाही सांगितलं की तब्बल २१ दिवस देशातील मजूर कामगार, शेतकरी चहा टपरीवाला, हॉकर्स, छोटे दुकानदार, कारागीर हे सर्व जे हातावर आणणे आणि पानावर खाने अशी यांची गत असते ते बिचारे जवळपास एक महिना कसे काय जगतील ? आणि देशात संचारबंदी असल्याने त्यांच्या घरी अनाज भाजीपाला नसेल तर ते जगणार कसे ? खरं तर पंतप्रधान मोदी हे केवळ घोषणा करतात पण प्रत्यक्षात काहीही घडत नाही हा इतिहास आहे आणि म्हणून कोरोना व्हायरस पसरू नये यासाठी राष्ट्रीय कार्य म्हणून भारतातील जनता घराच्या बाहेर निघणार नाही पण एक या देशाचा पंतप्रधान म्हणून नरेन्द्र मोदी यांनी केवळ १५ हजार करोड रुपयाची घोषणा ही आरोग्यावर खर्च करण्यासाठी केली की देशातील गरिबांना दोन वेळेचे जेवणासाठी दिली त्याचा कुठेही उल्लेख नाही आणि राज्य सरकार याबाबतीत केंद्र सरकारकडे मदत मागेल तरी ती रक्कम मिळणार की नाही याची शाश्वती नाही, त्यामुळे देशावर आलेल्या या संकटाचा सामना करताना मोदी सरकार पूर्णतः अपयशी होईल अशीच जास्त शक्यता आहे.
मात्र याबाबत देशातील मीडिया पूर्णतः चुप असून त्यांना याबाबतीत येणाऱ्या दिवसात कोरोना मुळे लावलेल्या संचारबंदीचा काय परिणाम देशाच्या परिस्थितीवर होईल याबाबत एक्सपर्ट कडून चर्चा घडवून आणणे जरूरीचे आहे पण ते तसे करतील अशी शक्यता नसून मोदींचा निर्णय कसा चांगला आहे याबाबत आकडेवारी सह ते पटवून सांगतील अशीच जास्त शक्यता दिसत आहे. मात्र येणाऱ्या २१ दिवसात जो हाहाकार कोरोना व्हायरस मुळे होणार नाही तेवढा हा बेरोजगार झालेल्या व घरात बसलेल्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या प्रश्नाबाबत होईल एवढे मात्र नक्की ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here