Home चंद्रपूर पडोली त्रिमूर्ति हॉटेल मधे देशी विदेशी दारूची सर्हास विक्री?

पडोली त्रिमूर्ति हॉटेल मधे देशी विदेशी दारूची सर्हास विक्री?

संचारबंदीतही दुरदुरुन ग्राहकांची मोठी गर्दी ?

चंद्रपूर प्रतिनिधी :

एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावाला सर्वसामान्य जनता बळी पडू नये म्हणून केंद्र शासनाने लॉकडाऊन करून केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरू ठेवला आहे, त्यामुळे मैद्य शौकीनाचे चोचले आता पुरवणार कोण ? हा प्रश्न चंद्रपूर सारख्या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात असतांना पडोली येथे त्रिमूर्ति ढाबा चालविणारे पिसे हे त्याची पूर्तता करीत असल्याने तिथे चंद्रपूर बल्लारपूर येथील ग्राहक मोठ्या संख्येने येत असल्याची माहिती असून जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन असतांना इथे मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे इतर कुठेही दारूसाठा नसतांना केवळ त्रिमूर्ति हॉटेल मधे दारूसाठा असल्यामुळे दारूचे रेट हे दामदुप्पट असल्याची माहिती आहे, या संदर्भात एका ग्राहकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की यामधे पोलिस प्रशासनाचा सुद्धा सहयोग आहे, यावरून इथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होतं आहे आणि म्हणूनच पोलिस प्रशासन गप्प असल्याने पोलिस तेवढेच यात गुंतले असल्याचे बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here