Home चंद्रपूर धक्कादायक :- पोलिस अधिकारी दिपक मैस्के यांची जुव्वा खेळावर वाटमारी ? जिल्हा...

धक्कादायक :- पोलिस अधिकारी दिपक मैस्के यांची जुव्वा खेळावर वाटमारी ? जिल्हा पोलिस अधिक्षक दखल घेतील कां ? 

गुंडागर्दी नंतर आता मैस्के यांची वाटमारी पण आली समोर , रायटर लालू यादव यांच्यासह फण्टर, खबरी व इतर लोकांना घेवून जुव्वा खेळणाऱ्याचे ८ लाख रुपये केले लंपास, उच्चस्तरीय चौकशीची मागणी ! 

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर मधे रविवारच्या लॉकडाऊनच्या दिवशी केवळ ढाबा सुरू ठेवल्याच्या कारणावरून कुलदीप धावा संचालक व राजू चिन्नेवार यांना बेदम मारहाण करून पोलिस कस्टडीत ठेवण्याच्या नावाखाली आरोपीकडून १५ हजार घेणाऱ्या उपपोलिस निरीक्षक दिपक मैस्के यांचे करनामे बघून स्वतः जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक पण थक्क होईल एवढ्या यांच्या थरारक कहाण्या आता समोर येत आहे,
दिनांक १५ मार्च २०२० ला सायंकाळी ८.१५ वाजता जवळपास ३५ ते ४० लोक अस्टभुजा येथील जंगलात जूव्वा खेळताना उपपोलिस निरीक्षक दिपक मैस्के यांनी धाड टाकळी, खरं म्हणजे याच दिपक मैस्के यांनी आपले फण्टर तैनात करून व खबरी यांना कामाला लावून एक प्रकारचा जुव्व्याची रक्कम लुटण्याचा प्रकार केला आहे. कारण मोठ्या संख्येने जूव्वा खेळणारे असतांना केवळ पाच लोकांवरच गुन्हे दाखल कसे काय केले? यामधे जवळपास १५ ते १८ दोन चाकी वाहने होते याचा अर्थ प्रत्त्येक गाडीवर दोन या हिशोबाने ३५ च्या वर जूव्वा खेळणाऱ्याची संख्या होती, मात्र उपपोलिस निरीक्षक मैस्के, रायटर लालू यादव यांनी ज्या पद्धतीने खबरी फण्टर व इतर जवळीक असणाऱ्यांना घेवून जूव्वा खेळावर धाड टाकली ती एक प्रकारे जुव्व्यातील वाटमारिच होती. कारण त्यांनी जे फण्टर तिथे ठेवले होते त्यांनी जुव्व्यातील रक्कम हडपण्यासाठी चक्क जूव्वा खेळणाऱ्याना ढगलुण दिले व पैसा जमा केला आणि तो पैसा जवळपास ५ लाख रुपयाच्या वर होता अशी माहिती आहे.
या जूव्व्यात अडकलेले जवळपास पाच ते सहा लोकांनी पोलिस कारवाई तून वाचण्यासाठी उपपोलिस निरीक्षक मैस्के यांना प्रत्तेकी १५ हजार असे एकून ८० ते ९० हजार दिल्याचे बोलल्या जात आहे. यामधे ज्या १७ ते १८ गाड्या होत्या त्यापैकी ५ ते ७ गाड्यांचे प्रत्तेकी १० ते १५
हजार रुपये घेण्यात आले असे एकून ६० ते ७० हजार रुपये फण्टर आणि खबरी यांच्या मार्फत घेण्यात आले.
या जूव्व्या मधे ज्या पाच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्याकडून (खिशातून) जवळपास १५००००/-रुपये घेण्यात आले, या सर्व पैशाची गोळाबेरीज केली तर जवळपास ८ लाख रुपये जूव्वा धाडीतून पोलिसांनी मिळविले पण प्रत्यक्षात पोलिस स्टेशनमधे जूव्व्यात मिळालेली रक्कम ही केवळ १० हजार दाखवण्यात आल्याने उपपोलिस निरीक्षक यांनी उर्वरित ७ लाखांपेक्षा जास्त रक्कम ही हडप केली आहे. त्यामुळेच जूव्वा खेळावर पैसे लुटिच्या इराद्याने धाड टाकण्यात आली हे शीद्ध होते, शिवाय जंगलात धाड टाकायची तर वन विभागाला कळवले होते कां ? आणि जंगलात हिंस्त्र प्राणी असतात त्यांचा जर हमला झाला असता तर मैस्के यांनी याची जबाबदारी घेतली असती कां ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्त्याने उभे राहतात, त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन उपपोलिस निरीक्षक यांची तत्काळ येथून हकालपट्टी करावी अशी मागणी आता होऊ लागली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here