Home चंद्रपूर मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी घेतला कोरोना COVID-19 सर्वेचा आढावा ! 

मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी घेतला कोरोना COVID-19 सर्वेचा आढावा ! 

चंद्रपूर शहरात कुठेही पॉझिटिव्ह रुग्ण नाही मात्र सतर्कता पाळण्याचा वैद्यकीय सल्ला ! 

चंद्रपुर प्रतिनिधी :

शहर महानगरपालिका “अंतर्गत शहरी प्राथमीक आरोग्य केंद्र क्र 1” इंदिरा नगर केंद्रास मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी प्रत्यक्ष भेट देत आरोग्य केंद्रातिल डॉक्टर,नर्स व कर्मचर्यांची बैठक घेऊण M.E.L प्रभागात तसेच आरोग्य केंद्रा अंतर्गत भागात सुरू असलेल्या COVID 19 सर्वे चा आढावा घेतला.बैठकीत सर्वे दरम्यान सुरू असलेले कार्य,एकूण कर्मचारी,सर्वे करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या,पुणे मुम्बई नागपुर औरंगाबाद येथून आलेल्या विद्यार्थी,नौकरदार वर्ग आदींची महीती घेण्यात आली तसेच विदेश यात्रेतून परतलेल्या ची आकडेवारी घेण्यात आली तसेच सर्वे दरम्यान कर्मचार्यंच्या अडचणी आदी सर्व बाबी जाणुन घेण्यात आल्या.
COVID 19 सर्वे मधे आरोग्य केंद्र प्रमूख डॉक्टर जयश्री मालुसरे ,GNM नर्स प्रियंका नवाते,ANM नर्स- 3,आशा वर्कर-9,मनपा शिक्षक-4 व अंगणवाडी सेविका-2 आदीच्या माध्यमातून सर्वे सुरू आहे.
नर्सेस,कर्मचारी प्रभागात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन नागरिकांना कोरोना संदर्भात मौखीक व छापील पोम्प्लेट देउण माहिती देत आहे.घरातील एकूण सदस्यांची संख्या,प्रवासी इतिहास,त्याचबरोबर सर्दी ,खोकला,ताप सबंधीत माहिती संकलित करत आहे.महानगरपालिका तर्फे प्रभागात कोरोना संदर्भात जनजागृती करीता ओडियो प्रचाराची गाडी देखील फिरत आहे.
आढावा बैठकीत सुशिक्षित नागरिकच माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे कर्मचार्यानी संगितले.सुशिक्षित उचभ्रु नागरीक सर्वे कर्मचार्याना माहिती देण्यास नकार देतात तसेच तुम्ही सर्वे कर्मचारीच सगळी कडे फिरुन आमच्या कडे कोरोना विषाणूचा संसर्ग करणार असे बोलून सहयोग करत नसल्याचे कर्मचार्यनी संगितले.
डॉक्टर,नर्स,शिक्षक व आशा वर्कर यांनी मिळुन 28/3/2020 पर्यंत 5318 घरांचा सर्वे केला त्यांची लोकसंख्या 21072 आहे त्यात राज्यांतर्गत प्रवासी 133,बाहेर राज्यातून आलेले 44 त्याच प्रमाणे विदेशी प्रवासी 4 आहे.
अशा एकूण लोकांची महीती घेऊण त्यातील काहीना होम quarantaine चे शिक्के मारण्यात आले आहे.त्याना सर्दी,खोकला,ताप आदी लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आली आहे.त्यांचेवर डॉक्टर,नर्सेस लक्ष ठेऊन आहेत प्रत्यक्ष भेट तसेच मोबाइल द्वारे सम्पर्क करुण त्यांच्या तब्बेती ची माहिती घेण्यात येत आहे.सर्वे दरम्यान एकही रुग्ण पॉजिटिव मिळाला नाही कुणातही कोरोना संसर्गजन्य लक्षण दिसून आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here