Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :-काठीयावाड कोल व गुजरात कोल चा कोळसा पडोली च्या टालावर!

ब्रेकिंग न्यूज :-काठीयावाड कोल व गुजरात कोल चा कोळसा पडोली च्या टालावर!

पत्रकार राजकिय कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर कोळसा टालवर लक्ष केंद्रित केल्याने कोळशाच्या वेकोलितून निघालेल्या गाड्या अजूनही रस्त्यातच ! वेकोलितील डीओ मधे या ट्रकांचे क्रमांक नाही, काही राजकिय  भामटय़ांनी साधली होती संधी आणि तांडव करून केली वसुली ! 

चंद्रपुर प्रतिनिधी : –

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा चोरीचे प्रकरण कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांच्यापासून सुरू झाले असले तरी ऑनलाईन कोळसा खरेदीच्या नावाखाली पडोली, नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टालवर कोळसा खाली करणाऱ्या अनेक कोळसा माफियांची यादी आता हाती लागली असून आता मे. काठीयावाड कोल आणि गुजरात कोल ॲन्ड कोक चा सबसिडी चा कोळसा सुद्धा नागाडा, पडोली च्या कोळसा टालवर खाली होत असल्याचे दिसत आहे.

मंगळवार दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत असलेल्या डिओ चा हजारो टन कोळसा पडोली च्या कोळसा चोरांच्या टालावर पोचला आहे. मात्र आता त्या कोळसा टालवर पत्रकार आणि काही राजकिय कार्यकर्त्यांनी पहारा दिल्याने व कोळसा भरलेल्या गाड्यांचा पाठलाग सुरू झाला असल्याने जवळपास कोळशाच्या पाच ते आठ ट्रक गाड्या रस्त्यातच उभ्या असून पडोली परीसरात तीन गाड्या अजूनही खाली होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या गाड्या मागील ३० मार्चलाच डीआरसी आणि महाकाली कॉलरीतून निघाल्या होत्या त्या अजूनही खाली न  झाल्याने त्या नेमक्या जाणार कुठे ? गुजरात की कोळसा टालवर? याबाबत अजूनही शंका आहे. मात्र काही दिवसांपूर्वी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीचा आधार घेत काही राजकिय खंडणी बहादुर भामटय़ांनी संधी साधून कोळसा टाल मालकांकडून लाखोंची रक्कम धमकी देवून वसूली  केल्याची चर्चा असल्याने कोळशाच्या या खेळात कोळसा माफियांनी किती  पत्रकार व राजकिय कार्यकर्त्यांना किती रक्कम वाटली त्याची माहिती पण आता जाहीर होण्याच्या मार्गावर असून पडोली परीसरात  कोळसा भरून असलेले ट्रक खाली न  होण्यामागे काय गुपित काय ? हे लवकरच समोर येणार आहे.

कोळशाच्या बातम्यांकडे कोरोना लॉकडाऊनमुळे प्रशासनाची डोळेझाक !

सबसिडीच्या दरात मिळणारा कोळसा हा कोळसा माफियांच्या माध्यमांतून नागाडा व पडोली येथील टालवर उतरवून नंतर तो मोठ्या किमतीत चोर बाजारात  विकला जातो,  या संबंधात वारंवार वृत्त प्रकाशित झाल्यानंतर सुद्धा  स्थानिक अधिकाऱ्यांशी हातमिळवणीतून हा चोरीचा प्रकार कागदोपत्री घड्या नीट बसवून करण्यात आला आहे. आज देशावर कोरोना या महाभयंकर बिमारीचे संकट कोसळले आहे. या संकटाला मात देण्यासाठी देशातील साधारण व्यक्ती पासून तर मोठ्या उद्योगपतींनी पंतप्रधान मोदी व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हाकेला हो देत मदतीची साथ दिली आहे. मात्र एकीकडे देश संकटातून उभरण्याच्या प्रयत्नात असतांना कोळसा चोर मात्र सबसिडीच्या कोळसा चोरीतून सरकारलाच नाही तर सर्वसामान्यांना ही लुटण्यात अग्रेसर राहिले आहे. एकीकडे कोरोनाचे युद्ध तर  दुसरीकडे पडोली च्या टालावर कोळसा तस्करांची लुटालुट सुरू आहे. चोरीच्या या नाट्ट्याचे  हे काही भाग आहेत आणखीन पूर्ण नाट्य पुन्हा कधी सुरू होईल आणि कोळसा तस्करांवर कायद्याचा बडगा वेकोली प्रशासन कधी व कसा उगारेल हे पाहणे आता बाकी आहे. कोळसा चोरीच्या या नाटकाचे किती भाग अजून अधिकाऱ्यांच्या सहभागाने चालतात हे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.
काळोख्या रात्री चालणारा कोळसा तस्करांच्या सबसिडीचा कोळसा पडोली च्या टालावर रातोरात पोहोचविण्याचा खेळ 31 तारखेपर्यंत सुरळीत सुरू होता. खुलेआम कायद्याची पायमल्ली होत होती.
फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र स्टेटस मायनिंग कार्पोरेशनच्या सबसिडी अंतर्गत कैलास अग्रवाल यांच्या 26 गाड्या कोळसा चोरीचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर वेकोली प्रशासनाने मायनिंग कार्पोरेशनचे करार रद्द केले  परंतु कैलास अग्रवाल याला न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात यश मिळाल्यामूळे कोळसा तस्करांच्या हिंमतीत वाढ झाली आहे. नागाडा कोळसा टालावरील चोरी प्रकरणाची शाई ओली असतानाच गुजरात येथील अहमदाबाद काठीयावड कोल व गुजरात कोल च्या माध्यमातुन सबसिडीच्या कोळसा खुलेआम पडोली च्या टालावर मोठ्या प्रमाणात उतरवण्यात आला. वेकोली प्रशासनाच्या नियमाला धाब्यावर बसवून कोळसा तस्कर सरकारी संपत्तीची खुलेआम चोरी करून करोडो रूपयाची अफरातफर  करीत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार कोळसा माफियांचा पर्दाफाश ! 

वेकोली प्रशासनाचे नियम बघितले असता कुठल्याही डीओ मधे ज्या कंपनीमधे कोळसा जातो त्या कंपनीचे नाव, यासह ज्या वाहनातून हा कोळसा जातो त्या वाहनांचे क्रमांक हे समाविष्ट असते मात्र सद्यस्थितीत जे ट्रक कोळशानी भरली जात आहे त्या कोळशाच्या डीओ मधे ट्रकांचे क्रमांकच नसल्याने हा पूर्ण कारभार चोर मार्गाने होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्या उद्योगांना सबसिडीचा कोळसा दिला जातो, तो सरळ त्या-त्या उद्योगांपर्यंत पोहोचायला हवा मात्र नागाडा किंवा पडोली कोल डेपोवर तो उतरविला कसा जातो ? हा संशोधनाचा व कारवाईचा विषय आहे. या चोरीच्या व्यवसायात सगळ्या चोरांनी आता एका ठिकाणी येऊन नवीन मार्ग शोधला आहे. चंद्रपूर ही कोळशाची जननी आहे. कोळसा तस्करीच्या व्यवसायात अनेक व्यवसायी  आता सक्रिय झाले आहेत. सबसिडीच्या कोळसा ज्या चोर मार्गाने तळापर्यंत पोहोचतो त्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून शोध केल्यास मोठे घबाड चंद्रपुरात उघडकीस येऊ शकते. परंतु  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आता कोळसा माफियांचे फावलें आहे, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व इतर पदाधिकारी हे हा मुद्दा पुराव्यानिशी मांडून यासंदर्भात सीबीआय चौकशीसाठी आग्रह करणार असल्याने १५ एप्रिल नंतर या कोळसा माफियांच्या व्यवहारांची पूर्ण चौकशी होऊन यांच्यासह वेकोलि अधिकारी व महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन च्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्या संपत्तीची सुद्धा चौकशी होणार एवढे मात्र निश्चित !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here