Home कोरपणा कोठोडा (बूज) येथे धान्य दुकानदारावर गावकऱ्यांनी केली तक्रार.

कोठोडा (बूज) येथे धान्य दुकानदारावर गावकऱ्यांनी केली तक्रार.

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अन्नधान्याचा तुटवडा पडू नये म्हणून एप्रिल, मे, जून या तीन महिन्याचे धान्य एकत्रित वितरण करण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे.मात्र कोठोडा (बूज) येथील रास्तभाव दुकानदार श्री.दत्ता भीमराव मेश्राम यांनी नियम तोडल्याचे प्रकरण दिसले, अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना २९० रुपयात ६० किलो. तांदूळ ४५ किलो गहू व ०१ किलो साखर वाटप करणे गरजेचे असताना ५५ किलो तांदूळ, ४० किलो गहू व ०१ किलो साखर एवढेच धान्य देऊन सरळ ३६० रुपये घेऊन धान्य वाटप केले.व राशन कार्ड मध्ये ६० किलो तांदूळ ४५ किलो गहू व ०१ किलो साखर असे नोंद केले.असता विचारणा केली तर उत्तर न देता सरळ ०१ रुपया जास्त आकारणी करतो व धान्य हे सर्वांना पुरवण्यासाठी कमी देतो असे प्रति उत्तर दिले.व घेतलेल्या धान्याची पावती सुध्दा दिली जात नाही. हे कार्य काही वर्षांपासून सतत चालू आहे. ह्या कोरोना संचारबदी मध्ये उघड झाली. कोठोडा (बूज) येथील धान्य दुकानदार ग्रामस्थांना अशा काळात सुद्धा लुटमार करण्याची गंभीर समस्या असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली व यांचा परवाना रद्द करण्याची मागणी महेद्र वाकलेकर (तहसीलदार) यांच्या कडे केली.

Previous articleआनंदाची बातमी :- भारतीयांना कोरोना होण्याची फार कमी शक्यता, अमेरिकन डॉक्टरांचा खुलासा !
Next articleब्रेकिंग न्यूज :-काठीयावाड कोल व गुजरात कोल चा कोळसा पडोली च्या टालावर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here