Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :-अखेर “ते” लपवून ठेवलेले कोळशाचे ट्रक कोळसा माफियांच्या पडोली व...

ब्रेकिंग न्यूज :-अखेर “ते” लपवून ठेवलेले कोळशाचे ट्रक कोळसा माफियांच्या पडोली व नागाडा टालावर झाले रिकामे,

कोळसा चोरीमधे कैलास अग्रवाल, जैन बंधूसह इतर छुपे रूस्तम कोळसा माफिया सामील ! ते ट्रक नेमके कुणाचे ? याची माहिती आली समोर !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातून लघू व मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दरात मिळणारा कोळसा चंद्रपूर येथील कोळसा माफियांनी पडोली रोडवर लपवून ठेवला असल्याचे पुराव्यानिशी वृत्त भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले होते. 31 मार्च रोजी चंद्रपूर येथील डी.आर.सी. व एम.के.सी. खदानीतून कोळसा काढण्यात आला. 31 मार्च ही डीओची शेवटची तारीख होती. खाणीतून निघणारा हा कोळसा सरळ त्या उद्योगांकडे जावून तिथेच रिकामा व्हायला हवा होता. मात्र कोळसा खाणीतून निघणारे कोळशाचे ट्रक हे पडोली व नागाडा येथील कोळसा माफियांच्या डेपोवर रिकामे केले जातात व त्याठिकाणी कोळशाची मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली जाते, असे अनेक प्रकरण चंद्रपुरात उघडकीस आले आहे.
नुकतेच फेब्रुवारी महिन्यात नागाडा येथील कैलास अग्रवाल यांच्या टालावर सबसिडीचा कोळशाचा साठा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पकडून कैलास अग्रवाल सह अन्य कोळसा माफियावर गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर वेकोलि प्रशासन व महाराष्ट्र स्टेट मायणींग कार्पोरेशन खडबडून जागे झाले होते, गोपनीय माहितीनुसार कैलास अग्रवाल यांनी आपले घबाड लपविण्यासाठी मायनींग कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना लाखोंचे उपहार दिले होते व काही पत्रकारांना सुद्धा रसद पोहचवली होती अशी माहिती आहे. परंतु स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन च्या भ्रष्ट कारभाराचे पुरावे समोर आल्याने त्यानंतर वेकोलि प्रशासनाने मायनींग कार्पोरेशन सोबतचा करारच रद्द केला व कोळसा माफियांना उघडे पाडण्याच्या प्रयत्न केला, परंतु स्थानिक वेकोलिच्या अधिकाऱ्यांशी संगनमत व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे सहकार्य न मिळाल्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाच्या प्रयत्नावर पाणी फेरल्या गेले व कैलास अग्रवाल सह अन्य आरोपींचा या प्रकरणात जामिन मंजूर झाला. या कोळसा तस्करी प्रकरणात आरोपींना जामीन मिळावा यासाठी अनेक खेळी खेळण्यात आल्या. तपास करणाऱ्या पोलिसांना कोणतेही सहकार्य मीळू नये यासाठी कोळसा माफिया सक्रिय झाले होते व या प्रकरणातून सर्वच आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला व अग्रवाल व अन्य आरोपींच्या यांच्या जामीनानंतर या व्यवसायातील तस्करांच्या हिंमतीत दुपटीने वाढ झाली व हा व्यवसाय आणखीन मोठ्या स्तरावर चंद्रपूर शहरात सुरू झाला. वरील प्रकरणात जुने कोळसा तस्करांचे धागेदोरे तर जुळले नाही नां ? याचा सुद्धा तपास व्हायला हवा तसेच अधिकाऱ्यांना व संबंधितांना कुणाचे “आशिष” प्राप्त आहे, या बाबींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.
सविस्तर वृत्त असे की, 31 मार्च रोजी डी.आर.सी. व एम.के.सी. खदानीतून डीओ चा कोळसा ट्रकांमध्ये भरून काढण्यात आला. लघुउद्योगांना सबसिडीच्या दरात देण्यात येणारा हा कोळसा होता. महत्वाचे म्हणजे खाणीतून ट्रकमध्ये भरून जेव्हा कोळसा बाहेर निघतो त्यावेळी काट्यांवर ट्रकच्या आगमनाची व लोडेड गाड्यांच्या भरून बाहेर निघण्याची वेळ व गाडी क्रमांक त्या-त्या खाणीत नमूद करणे बंधनकारक असते. डी. आर.सी. मधून निघालेले कोळशाने भरलेले ट्रक मागील दोन दिवसापासून पडोली रोडवर उभे करण्यात आले होते. खाणीतून निघालेला कोळसा सरळ उद्योगापर्यंत किंवा संबंधित ठिकाणापर्यंत निर्धारित वेळेत पोहोचायला हवा असा नियम असतानाही हे कोळशाचे लोडेड ट्रक पडोली मार्गावर लपवून ठेवण्यात आले होते. लपवून ठेवण्यात आलेले हे ट्रक चोरट्या मार्गाने पडोली व नागाडा येथील टालावर आता रिकामे करण्यात आल्याचे कळते. महत्त्वाचे म्हणजे सध्या कोरोनामुळे लावण्यात आलेली कर्फु स्थिती बघता सगळेच अधिकारी देशसेवेत व्यस्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोळसा दळण-वळणासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अत्यावश्यक सेवांना ही परवानगी दिली जाते. मिळालेल्या माहितीनुसार कोळशाच्या या ट्रकांनी अशी कोणतीच परवानगी घेतलेली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. डी.आर.सी. येथून १ ते ६ तारखेपर्यंत कोणतेही do अजून मंजूर करण्यात आले नाही, मग आता हे लोडेड ट्रक कोणत्या खाणीतून आले, उपप्रादेशिक परिवहन विभागाची मंजुरी नसताना लपवून ठेवण्यात आलेले हे ट्रक पडोली व नागाळा येथील कोळसा टालावर कसे रिकामे करण्यात आले? हा कोळसा कोणत्या उद्योगासाठी मंजूर झाला होता? व तो कुठपर्यंत जाणार होता? कोळशांनी भरलेले ट्रक लपवून कां ठेवण्यात आले ? मंजुरी नसताना आता ते रिकामे कसे होत आहे ? या साऱ्या कोळसा चोरी मागे कोणते कोळसा माफिया सक्रिय आहे ? याचा तपास मायनिंग अधिकारी, वेकोली अधिकारी यांनी अवश्य करायला हवा. करोडो रुपयांच्या कोळसा वेकोली मधून चोरट्या मार्गाने बाहेर काढल्या जात आहे. कोळसा तस्कर देशावर आलेल्या बिकट संधीचा फायदा घेऊन करोडो रुपयांच्या कोळशाची सर्व नियम धाब्यावर बसवून हेराफेरी करीत आहे. पडोली व नागाडा येथे कोळसा टालावर जमा असलेला कोळसा कधीपासून व कसा जमा आहे? चोरट्या मार्गाने काढलेले कोळशाचे ट्रक कुठून निघाले व कुठे रिकामे झाले याचा शोध घेऊन कोळसा तस्करांच्या मुसक्या आतातरी आवळायला हव्यात अशी मागणी होतं असतांनाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबीकडे गांभीर्याने पाहत असून ते कोळशाचे ट्रक कुणाचे याचा शोध लागसं असून चारबंदी उठल्यानंतर कोळशाचे बेकायदेशीरपणे चालणारे कोळसा टाल जे कोळसा चोरीचे केंद्र बनले आहे ते बंद करण्यासाठी मोठे आंदोलन मनसेतर्फे मारण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Previous articleचंद्रपुरातील सकल जैन समाज तर्फे दररोज भोजन वितरित।
Next articleलॉक डाऊन मुळे अडकलेल्या मजुराना जनसत्याग्रह संघटने कडून भोजन व्यवस्था!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here