Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- रेड्डीचा प्रवक्ता सय्यद अनवर यांचे विरुद्ध घूग्गूस पोलीस स्टेशन...

ब्रेकिंग न्यूज :- रेड्डीचा प्रवक्ता सय्यद अनवर यांचे विरुद्ध घूग्गूस पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल ,

पत्रकाराच्या बातमी विरोधात सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया देवून बदनामी केल्या प्रकरणी सय्यद अनवर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी !

घूग्गूस प्रतिनिधी :-

घुग्गुस येथील स्वयंघोषित कामगार नेते तथा काँगेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांचे प्रवक्ट्र म्हणून सर्वात पुढे असणारे सय्यद अनवर रा. अमराई वार्ड घुग्गुस यांच्या विरुद्ध घुग्गुस पोलीस स्टेशन येथे वार्ताहर संजय पडवेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. समाज माध्यमात सय्यद अनवर यांनी दि.७/४/२०२० ला वर्तमान पत्रात “अन्नधान्य किटची मागणी करणारी महिला ताटकळत” काॅग्रेस शहराध्यक्षविरुद्ध संताप अशी बातमी वर्तमान पत्रात प्रकाशित केली होती. तिन चार दिवसा आधी विश्वसनीय सुत्राकडुन माहिती मिळताच बिएसएनएल कार्यालया जवळील सार्वजनिक ठिकाणी शोभा भिमराव कोखटे, ममता सतिश कांबळे, पुर्णिमा दिवाकर पुसाटे, करुना किशोर नरवडे, शांता मनोहर शेरखने व राधीका चौधरी सर्व राहनार अमराई वार्ड घुग्गुस यांची वॄत्तसंकलना साठी प्रतिक्रिया घेत मुलाखत घेतली.तेव्हा या महिलांनी घुग्गुस काॅग्रेस शहराध्यक्ष राजु रेड्डी यांनी आपल्या घरा बाहेर तास भर अन्न किट साठी आम्हाला ताटकळत ठेवले असा आरोप संतप्त महिलांनी केला, याचे विडीयो चित्रफित सर्व whats app, फेसबुक वर प्रसारित झाली होती,
परंतु यातील एक महिला शोभा भिमराव कोखटे यांचे राहते घरी जाऊन तिचा व तिच्या मुलाचा विडीयो चित्रफित तयार करुन संजय पडवेकर यांनी वर्तमान पत्रात प्रकाशित केलेले बातमी खोटी आहे असे समाज माध्यमात पसरविले व व्हायरल केले यामुळे वार्ताहराची व प्रसार माध्यमांच्या विश्वासहर्तेची बदनामी झाली.
त्यामुळे तथाकथित काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांचे प्रवक्ते सय्यद अनवर यांचे वर तत्काळ गुन्हा दाखल करुन कारवाही करावी अशी मागणी घुग्गुस पोलीस स्टेशन येथे संजय पडवेकर वार्ताहर यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहा.पो.नि. विरसेन चहांदे करीत असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे सय्यद अनवर यांचे वर सन २०१० मध्ये घुग्गुस पोलीस स्टेशन येथे कलम ३४१,१४३,२९४,५०६ व मुंबई पुलिस अॅक्ट १३४ गैरकायदा मंडळी जमा करने, अश्लील शिवीगाळ करने, रस्त्यात अळविने अश्या गंभीर स्वरूपा चे गुन्हे दाखल आहे.त्यामुळे आता पत्रकार संघाद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदन देवून या प्रकरणी सय्यद अनवर यांचेसह राजू रेड्डी यांचेवर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होणार असल्याची माहिती आहे.

Previous articleन.प. बांधकाम सभापती छोटू भाई शेख कडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण ! 
Next articleब्रेकिंग न्यूज :-मनपाच्या निधीतून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची भोजन वाटपातून चमकोगिरी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here