Home वरोरा न.प. बांधकाम सभापती छोटू भाई शेख कडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण ! 

न.प. बांधकाम सभापती छोटू भाई शेख कडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण ! 

वरोरा प्रभाग क्रमांक ४ मधील ४०० गरजू कुटुंबीयांना केली मदत ! 

वरोरा प्रतिनिधी :-

कोरोना व्हायरस मुळे लाकडाऊन करण्यात आल्याने  नागरिकांना घराचे बाहेर पडता येत नाही सोबतच दुकाने बंद असल्याने जीवनावश्यक वस्तू घेता येत नाही. अशा स्थितीत न.प.बांधकाम सभापती शेख जैरुद्दीन छोटुभाई शेख यांनी सामाजिक दायित्व जोपासून प्रभाग क्र. ४ अंतर्गत येत असलेले शहीद वीर बाबुराव शेडमाके वॉर्डमध्ये शेकडो नागरिकांना कार्यकर्त्यांचे हस्ते भाजीपाल्याचे वितरण करण्यात आले.
वरोरा शहरात समाजकार्य करणारे छोटुभाई प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहे .सदोदित गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असतात.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारे असे न.प. बांधकाम सभापती शेख जैरुद्दीन छोटू भाई हे दिवस रात्र स्वतःला समाजकार्यात झोकून देत असतात.
शहरातील जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने बंद असून,लाकडाऊन मुळे नागरिकांना घराचे बाहेर पडता येत नाही. गोरगरीब मजुरांच्या मजुऱ्या बंद झाल्या, जवळ पैसा नाही अन्नधान्य,भाजीपाला घेण्यासाठी त्यांच्यासमोर यक्षप्रश्न निर्माण झाला. सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष छोटू भाई यांनी उदारमनानी स्वतः आर्थिक भार उचलून मदतीचा हात समोर केला. आणि प्रभाग क्र.४ मध्ये कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नागरिकांना अन्न धान्य व भाजीपाला वितरण करण्यात आले.

चारशे कुटुंबातील नागरिकांना स्वखर्चाने अन्न धान्याची मदत

प्रभाग क्र. चारमध्ये दोन शासकीय धान्य दुकान असून,प्रभागातील चारशे कुटुंबातील चारशे नागरिकांना छोटुभाई शेख यांनी स्वतः आर्थिक भार उचलून अन्न धान्याची सढळ हाताने मदत केली.

स्वखर्चातून फागिंग मशिनद्वारे औषधींची फवारणी

प्रभाग क्र.४ व ५ मध्ये स्वखर्चातून फागिंग मशिनद्वारे औषधीचे धूर मारले व स्वतः पंपाद्वारे औषधींची फवारणी छोटुभाई शेख यांनी केली.

राजकीय व सामाजिक संघटनांनी मतभेद विसरून गोरगरीब नागरिकांना अन्न धान्य व आर्थिक मदत करून सहकार्य करावे असे आवाहन न.प. बांधकाम सभापती छोटुभाई शेख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here