Home चंद्रपूर हजरत बहेबुतुल्लाह शाह कमेटी जलनगर, चंद्र्पुर तर्फे घरपोच अन्नदान !

हजरत बहेबुतुल्लाह शाह कमेटी जलनगर, चंद्र्पुर तर्फे घरपोच अन्नदान !

कमेटीच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक .

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदीत सामाजिक संघटना गरीब परिवाराला मदत कार्य पोहचवीत आहे.परंतु तरीही शासनाची हवी ती मदत गरीब पीडितांना मिळत नसल्याने आता खुद्द धार्मिक संघटना सुद्धा कोरोनाच्या भयावह त्रासदीत मदत कार्य करीत आहे.

चंद्रपूर शहरात हजरत बहेबुतुल्ला शाह ही धार्मिक, सामाजिक संघटना गोर गरिबांना मदतीचा हाथ देत असून लॉकडाऊन च्या या काळात गोरगरिबांना घरपोच अन्नदान करीत आहे.

जगभरात थयमान घातलेल्या covid 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे त्यामध्ये गोर गरिबांचे अन्नधान्य व जेवणाची समस्या सुरु झाल्यापासून त्यांना आणखी त्रास सहन करावा लागू नये यासाठी *हजरत बहेबुतुल्लह शाह* कमिटीने एकजूटतेने संचारबंदी झाली तेव्हापासूनच गरजू लोकांची मदत करीत आहेत व त्यांना घरपोच टिफिन ची सुविधा करुन त्यांची मदत करीत आहेत ही मदत अल्पशी का होईना पण या कमेटी मेंबर्सनी त्या गरजू पर्यंत ही मदत पोहचवण्यात येत आहे या कार्यात पूर्ण कमेटी मेंबर्स अथक परिश्रम घेत आहेत संचार बंदीपासूनच त्यांचा हा उपक्रम सातत्याने सुरूच आहे या कार्यामध्ये प्रामुख्याने संघटनेचे सम्पूर्ण कार्यकर्ते आपले योगदान करीत आहे
ज्या गरजुना मदत हवी असेल त्यांनी कमेटी द्वारे मदत घेण्याकरिता या कमेटी मेम्बर ला खाली दिलेल्या नंबर वर फोन करा असे आव्हान करण्यात येत आहे. फोन 9096931879

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here