लॉक डाऊन वाढवीताना जरा जनतेच्या जीवनाचा विचार करा, लॉकडाऊन झाल्यापासून लाखों कंपन्या बंद, कोट्यावधी लोकांवर काम बंद झाल्याने उपासमारीची पाळी, लाखों कामगार जिकडेतिकडे आपल्या गावापासून दूर लटकलेले, कोट्यावधी लोक आर्थिक संकटात असल्याने आत्महत्या करण्याच्या मार्गावर, कुटुंबीयांच्या लॉकडाऊन ताटातूटीमुळे लोक डिप्रेशनमधे. जनतेसाठी मोठे आर्थिक पैकेज देणे गरजेचे,
लक्षवेधी :-
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे जगातील पहिले पंतप्रधान आहे जे ॲडॉल्फ हिटलर या तानाशहा प्रमाणे कधीही प्रसारमाध्यमांसमोर येवून पत्रकारांना देशातील स्थिती संदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली नाही, तर केवळ “मन की बात” आणि राष्ट्राला संबोधून भाषणबाजीच ते नेहमी करतात, त्यामुळे जनतेला अपेक्षित प्रश्नांना नेहमी वाचा फोडणारे पत्रकार पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याची संधीच मिळत नसल्याने शासनातर्फे अधिकृत माहिती आधारे बातम्या प्रकाशित करतात, ज्यामध्ये केवक एक बाजू मांडली जाते, पण जनतेला अपेक्षित दुसरी बाजू नेहमीच ही अनुत्तरीत व लपविल्या जाते.
आता देशावर कोरोना या व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्याची मोदींनी घोषणा केली पण त्याअगोदर त्यांनी देशातील जनतेला किमान ४८ तासांची आपापल्या घरी जाण्याची संधी द्यायला हवी होती. या दरम्यान त्यांची वैद्यकीय तपासणी करायला हवी होती, पण नेहमीच जणू आपत्कालीन स्थिती असल्याचे दाखवून नोटाबंदीसारखी रात्री ८ वाजता लॉकडाऊन ची घोषणा पंतप्रधान मोदींनी करून या देशातील जनतेला जणू वेठीस धरले आहे, कारण ज्याअर्थी भारतात जानेवारीलाच कोरोना रुग्ण मिळाला आणि त्यानंतर एवढे दिवस तुम्ही घालवले त्या दरम्यान तुम्हांला जनतेच्या या लॉकडाऊन मुळे उद्भवनार्या समस्येविषयी जाणीव नव्हती कां ? हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. पण मोदींना त्याचे काहीएक करायचे नाही कारन त्यांना फक्त हुकुमशहा बनायचे आहे. आता जवळपास २१ दिवस पूर्ण होण्याच्या मार्गावर असतांना त्यांनी जनतेला कुठल्याही प्रकारची सरकारी मदत पोहचवली नाही. देशात अनेक राज्यात अडकलेले कामगार मजूर यांना स्वतःच्या गावी जाण्यासाठी शासनाने व्यवस्था केली नाही. विदेशातून काही ठराविक भारतीय लोकांना देशात आणल्या गेले पण अजूनही लाखों लोक विदेशात अडकून आहे.देशातील लाखों कारखाने बंद आहे, मजूर कामगार घरी बसले आहे पण त्यांना पगार नाही. छोटेमोठे व्यवसाय करणारे दुकानदार हॉकर्स व फुटपाथवर धंदा करणारे घरीच असल्याने अशा कोट्यावधी लोकांना पैसा नसल्याने उपाशी मारण्याची वेळ आली आहे. सगळीकडे कोरोनाच्या भयाने केलेल्या लॉकडाऊन मुळे भीतीचे वातावरण आहे, पण अशा स्थितीत सुद्धा पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे देशातील जनतेला संबोधताना जनतेला आपण कोरोनावर काय उपाययोजना करतोय, आपण या दरम्यान देशातील जनतेला किती मदत करतोय.देशाची आर्थिक परिस्थिती कशी सांभाळत आहो? याबद्दल न बोलता ते केवळ थाळ्या वाजवा आणि दिवे लावा अशा प्रकारचे अंधश्रद्धा पसरवीणारे प्रयोग करायला सांगतात आणि आपल्या देशातील भोळी जनता बिचारी देशातील पंतप्रधानांच्या या प्रयोगाचे कुठलेही शास्त्रीय कारने न शोधता मुकाट्याने अनुकरण करतात जे पूर्णतः देशातील जनतेला भ्रमात टाकणारे काम आहे. नव्हे याची कारने शोधली तर भारतीय जनता पक्षाचा या संकटकाळात सुद्धा वर्धापन दिन असो की जनसंघातून भारतीय जनता पक्षात विलय असो त्या प्रसंगाचे इव्हेन्ट करून केवळ आपलाच उदोउदो मोदींचा सुरू आहे. याची अनेक उदाहरणे देता येईल. महत्वाची बाब म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी भारतातील आपत्ती व्यवस्थापनासाठी जे पीएम रीलीफ फंड हे खात सन १९४८ मधे काढलं, ज्या खात्यात अजूनही जवळपास ३ हजार ८ कोटी रुपये जमा आहे. विशेष म्हणजे या बैंक खात्यातील रक्कम ही कुणीही बघू शकतात कारण हे ऑनलाईन आहे, पण मोदींनी या संकटाच्या काळात सुद्धा देशातील जनतेकडून आपल्या पीएम केअर फंड या नव्याने निर्माण केलेल्या फंडात पैसे टाकण्याचे आव्हान केले, महत्वाची बाब म्हणजे या फंड कमेटीमधे कुठलाही सरकारी नौकर नाही तर भारतीय जनता पक्षाचे राजनाथसिंह वैगेरे लोकं आहेत, त्यामुळे या फंडात जनतेने, ऊद्दोगपतीनी आणि सेलेब्रिटि यांनी किती कोटी दिले याचा हिशोब जनतेला मिळणार नाही त्यामुळे जनतेला पंतप्रधान नरेन्द्र मोदी धोखा देतोय कां ? असा प्रश्न निर्माण होतं आहे, कारण अगोदरच पीएम रिलिफ फंड हे खात असतांना दुसरं खात खोलण्याची मोदींना काय गरज होती ? हे समजायला मार्ग नाही, पण याआडून आपल्या समोरच्या निवडणुकीसाठी पैसा जमा करण्याचा हा अनोखा फंडा असू शकतो? अशी राष्ट्रीय स्तरांवर चर्चा आहे.
आज पंतप्रधान नरेन मोदी पुन्हा एकदा देशातील जनतेला संबोधित करणार आहे, पण आजच्या दिवशी तरी जनतेला थाळ्या वाजविणारे व दिवा लावणारे प्रयोग पंतप्रधानांनी सांगू नये तर आम्ही राष्ट्रीय स्तरावर कोरोना व्हायरसवर काय प्रतिबंधात्मक उपाय करीत आहो. देशातील जनतेला आम्ही काय मदत करीत आहो, सगळी आर्थिक घडी विस्कळीत झाल्याने अशाही परिस्थितीत देशातील ऊद्दोग धंदे. व्यापार आम्ही सुरळीत कसे आणणार आहो ? या संदर्भात जाहीरपणे बोलायला हवे , अशी देशवाशीयांची अपेक्षा आहे. मात्र आता ते गटारातून गैस निर्मीती आणि थाळ्या, दिवे हे जे प्रयोग सांगून भाकडकथा रंगविणार असेल तर जनता तुम्हांला अशा कठिन परिस्थितीत माफ करणार नाही हे लक्षात ठेवा.
खरं तर भारतात 30 जानेवारी रोजी पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर आता तब्बल कोरोनाची संख्या तिपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ विदेशातून परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हळुहळु क्लस्टर आउटब्रेक आणि संपर्कातून संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णांचा आकडा कमी दिसत असला तरी, त्यात होणारी वाढ ही भारतासाठी धोक्याची आहे. भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. पण तिसऱ्या टप्प्यावर पौहचयला वेळ लागणार नाही पण पंतप्रधान मोदी हे केवळ बोलतात पण करीत काही नाही कारण जर जानेवारीला पहिला रुग्ण मिळाल्यानंतर मोदींनी डोनल्ड ट्रम यांची मेजवानी आणि मध्यप्रदेश सरकारची स्थापना असले इव्हेन्ट ते करीत होते. जर त्यावेळी त्यांनी उपाययोजना केली असती विदेशातून येणाऱ्या नागरिकांची टेस्ट केल्या असत्या तर मोदींना तगलीगी जमात वर आरोप करण्याची व संकटाच्या काळात सुद्धा हिंदू मुस्लिम हा वाद चिघळवीण्याची आवश्यकता निर्माण झाली नसती, पण हे आता इतिहास जमा झाले असून आत्तातरी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देशातील जनतेचे हित लक्षात घेता निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे.