Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- बल्लारपूर येथे स्वतःच्या मुलांवर गोळ्या झाडून स्वतःलाही गोळ्या मारून...

ब्रेकिंग न्यूज :- बल्लारपूर येथे स्वतःच्या मुलांवर गोळ्या झाडून स्वतःलाही गोळ्या मारून वडिलांची आत्महत्या !

बल्लारपूरातील मुलचंद द्विवेदी यांनी आपल्या आकाश व पवन ह्या मुलांवर गोळ्या झाडून स्वतःला सुद्धा गोळ्या झाडल्या  आणि केली आत्महत्या, आकाश  याचा जागीच म्रूतू तर पवन गंभीर जखमी. कॉलरी वार्डातील जोकूनाला येथील राहत्या घरी थरारक प्रकार !

बल्लारपूर प्रतिनिधी :-

बल्लारपूर येथे मूलचण्द द्विवेदी यांनी घरातील आपसी वादात स्वतःच्या आपल्या दोन मुलांना गोळ्या झाडून व स्वतःवर सुद्धा गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामधे आकाश द्विवेदी ह्या मुलाच्या ह्रुदयात गोळी मारल्याने तो जागीच ठार झाला तर पवन द्विवेदी ह्या मुलाच्या हाताला व छातीला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी असून त्याचा डॉ. पौद्दार यांच्या हॉस्पिटल मधे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नागपूर येथील हॉस्पिटल ला पुढील उपचारांकरिता नेण्यात आले आहे.
ही घटना बल्लारपूर येथील कॉलरी परिसरातील दुपारी साडेचार वाजता ची असून म्रूतक आकाश  हा २५ वर्षाचा आहे तर गंभीर जखमी असलेला पवन १९ वर्षाचा आहे . ह्या घटनेचा तपास बल्लारपूर पोलिस करीत असून स्वतःच्या मुलांवर गोळ्या झाडण्या मागे काय कारण आहे ?हे अजून स्पष्ट झालेले नाही ..

Previous articleमहत्वाची बातमी :- प्रशासनाचा मॉकड्रिल यशस्वी….मात्र तेलंगाणातुन येणाऱ्या लोंढयांचे काय…?
Next articleअत्त्यावश्यक:- फेसबुक लाईव्ह वर राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष साधणार पत्रकारासी संवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here