Home चंद्रपूर थरारक :- भाजप नेते शिवचंद द्विवेदी यांच्या भावाने रिव्हॉल्व्हरने दोन मुलांवर गोळीबार...

थरारक :- भाजप नेते शिवचंद द्विवेदी यांच्या भावाने रिव्हॉल्व्हरने दोन मुलांवर गोळीबार करुन स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना !

आपल्याच मुलाचा खून करणारी बल्लारपूर मधील ही दुसरी घटना, मूळ चंद द्विवेदी यांच्याकडे रिव्हॉल्वर आली कुठून ? या बाबत चर्चेला उधाण, बाप बनला मुलांचा वैरी ?

बल्लारपूर प्रतिनिधी :-

बल्लारपूर शहरात काही महिन्यापूर्वी राहुल नगराळे या मुलाची त्याचे वडील सोपान नगराळे या वडिलांनी हातोड्याणे डोक्यावर वार करून जागीच हत्या केली होती आता त्याचीच पुनरावृत्ती झाली असून शिवचंद द्विवेदी या भाजप च्या माजी शहर अध्यक्षांच्या भावाने आपल्या आकाश व पवन नामक दोन मुलांवर रिव्हाल्वर ने गोळ्या झाडून ठार करण्याचा प्रयत्न केला त्यात आकाश नावाचा २४ वर्षीय मुलगा हा जागीच ठार झाला तर पवन याच्या हाताला व छातीला गोळी लागून गंभीर जखमी झाल्याने त्यला नागपूर येथे ऊपचारार्थ पाठविण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका भाजपचे माजी शहर अध्यक्ष असलेल्या शिवचंद द्विवेदी या नेत्याच्या घरी ही घटना घडली आहे. बल्लारपूर शहरातील भगतसिंग वॉर्डात हे हत्याकांड झाले. या नेत्याच्या मुलचंद द्विवेदी या भावाने घरगुती भांडणातून स्वतःच्या आकाश व पवन या दोन मुलांवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. त्यानंतर या व्यक्तीने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

आपल्याच मुलांवर गोळ्या झाडणाऱ्या या वडिलांचे नाव मूलचंद द्विवेदी आहे. तर, आकाश (वय 22) आणि पवन (वय 15) असं त्यांच्या मुलांची नावं आहेत. या गोळीबारानंतर आकाशचा रुग्णालयात नेताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर पवनला चंद्रपूरच्या डॉ. पौद्दार यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण प्रक्रुती गंभीर असल्याने त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या गोळीबार आणि आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मृत वडील मूलचंद द्विवेदी एका रोकड वाहतुक करणाऱ्या कंपनीत गार्ड असल्याची माहिती आहे. हे कुटुंब भाजप नेते शिवचंद द्विवेदी यांच्या घरी वरच्या मजल्यावर राहत होते. या घटनेने बल्लारपूर शहर हादरून गेलं असून मुलचंद द्विवेदी ने आपल्या घरी रिव्हॉल्वर कशी काय घरी आणली हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here