Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- नांदेड येथुन पळालेल्या त्या तीन संशयीतांची नांदेड प्रशासनाकडुन होणार...

ब्रेकिंग न्यूज :- नांदेड येथुन पळालेल्या त्या तीन संशयीतांची नांदेड प्रशासनाकडुन होणार पुढील पडताळणी ?

नांदेड येथील पथक तिनही इसमांना घेवुन रवाना ! नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिस अधीक्षक कार्यालयातून सूचना !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

आज काही प्रसारमाध्यमांनी तीन पॉझिटिव्ह रुग्ण चंद्रपूर येथे नांदेड वरून आल्याचे व त्यांच्यापासून किती लोकांना संसर्ग झाला असेल अशी शंका घेवून प्रशासनाची झोप उडवली होती मात्र तशा प्रकारची ती बातमी नसून जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयातून आलेल्या अधिकृत प्रेस नोट मधे असे म्हटले आहे की दिनांक ०६ मे २०२० रोजी रात्री दरम्यान माणिकगड (गडचांदुर) जिल्हा चंद्रपुर येथे नांदेड येथील आलेल्या तिन नागरीकांना संशयावरुन जिल्हा प्रशासन व पोलीसांचे मदतीने ताब्यात घेतले होते. पोलीस व कोव्हीड १९ नियंत्रण कक्ष प्रशासनाच्या वतीने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीसांसोबत सपंर्क केला असता चंद्रपुर येथील ताब्यात घेतलेले तिन इसमाचे नांवे ही नांदेड येथुन पसार झालेल्या इसमांसोबत मिळतेजुळते असल्याची माहिती मिळाली. तरीही पुढील खबरदारी म्हणुन नांदेड येथील पथक हे अॅम्बुलन्ससह चंद्रपुर येथे येवुन, माणिकगड येथुन ताब्यात घेतलेल्या नांदेड येथील तिनही नागरीकांना घेवुन पुढील तपासणी व पडताळणी कामी नांदेड येथे रवाना झाले आहेत.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच जनतेमध्ये संभ्रम व भिती निर्माण होईल अशाप्रकारे संदेश किंवा माहिती खात्री झाल्याशिवाय सोशल मिडीयावर प्रसारीत करु नये असा दम सुद्धा जिल्हा पोलिस कार्यालयातून आलेल्या प्रेस नोट मधून त्या अफवा पसरविनाऱ्या लोकांना भरला आहे …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here