Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूरमधे दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. प्रशासनाची झोप उडाली, लॉक डाऊन...

खळबळजनक :- चंद्रपूरमधे दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. प्रशासनाची झोप उडाली, लॉक डाऊन सक्त करण्याचे संकेत !

यवतमाळ येथून आली एक मुलगी कोरोनटाईन असतांना निघाली पॉझिटिव्ह पुन्हा एकाची रिपोर्ट प्रतीक्षेत ?

चंद्रपूर प्रतिनिधी :

चंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त होण्याच्या मार्गावर असतांना आता पुन्हा एक पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने चंद्रपूर शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाची यामुळे झोप उडाली आहे. बिनबा गेट परिसरात एका मुलीची आई यवतमाळात एका रुग्णालयात मागील दीड महिन्यापासून भरती होती. आताच दिनांक ९ मे ला तिला रूग्णालयातून सुट्टी झाली आणि ते परत चंद्रपूरला आले होते. यादरम्यान त्यांना चंद्रपूर येथे होम कोरोनटाईन करून त्यांचे स्वैब तपासणी करिता नागपूरला पाठवले होते. दरम्यान आज दिनांक १३ मे ला त्या मुलीची रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून त्या पॉझिटिव्ह रुग्णाला तत्काळ समोरील उपचारांकरिता नेण्यात आले आहे. विशेष म्हणजे ती पॉझिटिव्ह रुग्ण घरीच होम कोरोन टाईन असल्याने इतराना तिचे पासून संक्रमण झाले नसावे अशी शक्यता आहे. त्यामुळे भीतीचे काहीही कारण नसून पुन्हा तिचे भावाचा रिपोर्ट येणे बाकी आहे. या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे कोरोना मुक्त चंद्रपूर आता लॉक डाऊन च्या चक्रव्यूहात अडकल्याने चिंतेचे सावट पसरले आहे असे दिसते ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here