Home चंद्रपूर खळबळजनक :-चंद्रपूरमध्ये आणखी एक पॉझिटीव्ह वाढल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहचला १३ वर.

खळबळजनक :-चंद्रपूरमध्ये आणखी एक पॉझिटीव्ह वाढल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहचला १३ वर.

क्रुष्ण नगरच्या त्या रुग्णाची दुसरी रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आल्याने त्याची नागपूर च्या रूग्णालयातून सुट्टी !

कोरोना अपडेट रिपोर्ट :-

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
नवा रुग्ण चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरातील आहे. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली.तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात येणार आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
22 मे च्या रात्री आलेल्या या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 13 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 13 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे .

Previous articleविशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार !
Next articleसंतापजनक :-लॉकडाऊन काळात सुद्धा हरीश ठक्कर सुगंधित तंबाखू बेभाव विकत असल्याने संताप ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here