Home चंद्रपूर विशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार...

विशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार !

चंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार नागरिकांचे आत्तापर्यंत आगमन. 36 हजार मजुरांना जिल्ह्यातून आतापर्यंत देण्यात आला निरोप. एक हजारावर कर्मचारी स्थलांतरितांच्या कामांमध्ये व्यस्त.

चंद्रपूर, प्रतिनिधी :-

कोरोना आजाराच्या लॉक डाऊनमध्ये शिथीलता जाहीर झाल्यावर नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि हातावर पोट असणाऱ्या हजारो मजुरांचे स्थलांतरण जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घटनाक्रमाला प्रशासनातले 1 हजार कर्मचारी मानवतेतून पार पाडत आहे. जिल्ह्यातून बाहेर अर्थात आपल्या राज्यात, जिल्ह्यात स्वगावी गेलेले 36 हजार 129 नागरीक आहे. तर बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 67 हजार 553 नागरीक परवानगीने स्वगावी आलेले आहे.

प्रत्येक राज्याची राज्यनिहाय यादी तयार करणे, मजुरांची माहिती मिळविणे, अन्य राज्याच्या प्रशासनाची समन्वय ठेवणे, आगार प्रमुख, रेल्वे आस्थापना, त्यांच्या वेळा, तिकीट काढून देणे खानदानाची व्यवस्था करणे प्रत्येकाला गाडीमध्ये बसून देणे असे संवेदनशील विषय या काळामध्ये प्रशासनाला हाताळावे लागत असून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, तहसिलदार संजय राईंचवार, तहसिलदार निलीमा रंगारी तसेच बाहेर राज्यात कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी कार्यरत असणारे नोडल अधिकारी समाजकल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांच्यासह जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्य अधिकारी, मनपाचे संबंधीत अधिकारी, तलाठी यासाठी प्रयत्नरत आहेत. जिल्हा प्रशासनातील जवळपास 1 हजार 206 अधिकारी-कर्मचारी यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.

कोरोना लॉकडाऊन काळात चंद्रपूर, तसेच चंद्रपूर जिल्ह्यात, बाहेर राज्यात, जिल्ह्यात नागरीक अडकलेले आहे. या सर्व नागरीकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रशासनामार्फत परवानगी आता दिली जात आहे. आतापर्यंत आलेली आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

जिल्ह्यातून स्वगावी गेलेले नागरिक :

20 मे पर्यंत रेल्वेने झारखंड राज्यात 261, बिहार राज्यात 829, उत्तर प्रदेश राज्यात 669 तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 192 असे एकूण 1 हजार 951 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.

विविध मार्गाने जसे बस, जीप, ट्रकनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 9622, छत्तीसगड 3 हजार 200, राजस्थान 541, आंध्रप्रदेश 81, झारखंड 216, बिहार 617, उत्तर प्रदेश 970, मध्यप्रदेश 2642, तेलंगाना राज्यात 311 असे एकूण 18 हजार 200 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.

मॅन्युअली पास निर्गमित करून (इशू ऑफलाइन पासेस) महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 5 हजार 772, छत्तीसगड 1 हजार 443, राजस्थान 321, तेलंगाना 324, आंध्र प्रदेश 102, झारखंड 285, बिहार 710, उत्तर प्रदेश 1 हजार 155, मध्यप्रदेश 1 हजार 46 असे एकूण 11 हजार 158 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.

ई- पास (ऑनलाइन पास इशू) काढून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये 2 हजार 255, छत्तीसगड 42, राजस्थान 16, तेलंगाना 112, आंध्रप्रदेश 20, झारखंड 8, बिहार 28, उत्तर प्रदेश 56, मध्यप्रदेश 57, असे एकूण 2 हजार 594 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये 310, छत्तीसगड 1 हजार 458, मध्यप्रदेश 458, असे एकूण 2 हजार 226 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.

जिल्ह्यात स्वगावी आलेले नागरिक :

20 मे पर्यंत रेल्वेने तेलंगानातून 1 हजार 729 नागरीक जिल्ह्यात स्वगावी आलेले आहेत. तसेच विविध मार्गाने जसे बस, जीप, ट्रक यामधून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 329, तेलंगाना 45 हजार 303, असे एकूण 45 हजार 632 नागरीक जिल्ह्यात स्वगावी परत आलेले आहेत.

मॅन्युअली पास निर्गमित करून (इशू ऑफलाइन पासेस) महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 4 हजार 585 नागरीक स्वगावी परत आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या बसेसने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 101 नागरिक जिल्ह्यामध्ये स्वगावी परत आलेले आहे.तसेच, लॉकडाऊनच्या काळापासून तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे मार्फत सुध्दा आज पर्यंत आलेल्या नागरीकांची नोंद असून हि सर्व एकत्रित संख्या केली तर एकुण 67 हजार 553 नागरिक जिल्ह्यात परत आले आहे.

प्रशासनातील 1 हजारावर अधिकारी कर्मचारी कार्यरत :

लॉकडाऊन मध्ये अडकलेले नागरीक हे त्यांच्या मूळ गावी जावे यासाठी जिल्हा प्रशासनातील तब्बल 1 हजार 206 अधिकारी-कर्मचारी दिवसातून 12 ते 14 तास अविरत झटत आहेत. या सर्वांचा एकच उद्देश म्हणजे जिल्ह्यात व जिल्हा बाहेर अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित त्यांना स्वगावी परत पोहोचविणे हा आहे.

संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यात आलेल्या व जिल्ह्याबाहेर गेलेल्या नागरीकांची संपूर्ण खबरदारी घेतल्या जाते तसेच या सर्वांचा लेखाजोखा एकत्रित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.कोरोना विरुध्दच्या लढ्यामध्ये प्रशासनाचे असंख्य अधिकारी, कर्मचारी आपली भुमिका पार पाडत आहेत.आपण सर्वांनी यांना कृतज्ञता म्हणून घरात राहुन साथ देण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
00000

Previous articleआंदोलन :- शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकास दिला चोप ?
Next articleखळबळजनक :-चंद्रपूरमध्ये आणखी एक पॉझिटीव्ह वाढल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहचला १३ वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here