Home वरोरा आंदोलन :- शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकास दिला चोप ?

आंदोलन :- शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकास दिला चोप ?

प्रहार पदाधिकारी किशोर डुकरे आणि गणेश उराडे यांचे नेत्रुत्व !

वरोरा प्रतिनिधी : –

वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक खांबाडा येथील बैंक व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांना कर्जात वाढ ना देता चक्क कर्ज देण्यास नकार दिल्याने प्रहार विद्यार्थी संघटनेचे गणेश उराडे आणि शेतकरी आघाडी चे किशोर डुकरे यांनी पुढाकार घेत काही शेतकऱ्यांना घेवून बैंक कार्यालयात चक्क बैंक व्यवस्थापकाला चोप दिल्याने खळबळ उडाली होती. नियमानुसार नियमित कर्ज भरून सुद्धा त्या शेतकऱयाला कर्जात वाढ मागितली असता आपमानास्पद वागणून बैंक शाखा व्यवस्थापक देतात हे माहीत होताच प्रहार सेवकांनी त्या शाखा व्यवस्थापकास चांगलाच धडा शिकवीला आणि तात्काळ नवीन कर्जदारांना आणि कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा अन्यथा तुमच्या बँक सामोर शेतकरी ठाण मांडून बसेल याला तुम्ही जबाबदार असाल असे प्रहार सेवकांनी त्या अधिकाऱ्याला बजावून सांगितले
महाराष्ट्र सरकारने सर्व स्तरावर परिपत्रक काढून कोणत्याही शेतकऱ्याला नाहक त्रास देऊ नये असे परिपत्रक काढुन सुद्धा शासनाच्या परिपत्रकाराला घरचा अहेर हे बँक व्यवस्थापक देत होते. हे प्रकरण लवकर मार्गी लावा नाही तर आम्ही आता आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर अखेर व्यवस्थापकाने येत्या सहा दिवसात हे सर्व प्रकरण मार्गी लावू आणि शेतकऱ्याला कर्ज वाटप करू असे आश्वासन शाखा व्यवस्थापकांनी दिल्याने प्रकरण शांत झाले परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज बैंक व्यवस्थापकांनी दिले नसल्याची माहीती आहे.

Previous articleआर्थिक मंदी :- मंगल कार्यालय, सभागृह, कैटरिंग, डेकोरेशन असोसिएशनचे तहसीलदार यांना निवेदन !
Next articleविशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here