Home भद्रावती आर्थिक मंदी :- मंगल कार्यालय, सभागृह, कैटरिंग, डेकोरेशन असोसिएशनचे तहसीलदार यांना निवेदन...

आर्थिक मंदी :- मंगल कार्यालय, सभागृह, कैटरिंग, डेकोरेशन असोसिएशनचे तहसीलदार यांना निवेदन !

लॉकडाउनमधे सर्व व्यवहार बंद असल्याने हजारो लोकांवर आर्थिक मंदीची टांगती तलवार ! ५० ऐवजी २०० ते ३०० लोकांची मंगल कार्यास उपस्थित राहण्याची परवानगी द्या, असोसिएशनची मागणी !

उमेश कांबळे – तालुका प्रतिनिधी-

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य हे लॉकडाऊन असल्याने आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात सापडले असून, “जान हैं तो जहान हैं” हया संदेशाचे पालन करून जनता लॉक डाऊन पाळत असली तरी बेरोजगारीने ग्रासलेल्या गरीब जनतेची हलाखीची व दयनीय परिस्थिति चिंतेची बाब झाली आहे, गत दोन महिन्यापासुन लॉकडाउन सुरू आहे, आणि या लॉकडाउनचा फ़टका राज्यातील सर्व जिल्हा तालुका यासह भद्रावती येथील मंगल कार्यालये, कटरिंग आणि डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे, सध्या भद्रावती स्थित २० ते २५ मंगल कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात डेकोरेशनचा व्यवसाय करनारे आणि ८० ते ९० कटरिंग चा व्यवसाय करनारे आहेत, हे व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने भद्रावती बाजारपेठवर त्याची मोठी आर्थिक झळ बसली आहे, या व्यवसायिकानी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी बैंक कडून घेतलेले कर्ज, बचत गट कर्ज, ग्राहकाचे अडवांस बुकिंग चे पैसे परत करायचे तरी कसे ?असा त्याच्या सामोर आर्थिक प्रश्न उभा आहे ? याबाबतीत त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले, आणि पत्रकार परिषद घेवून आपल्या मागन्या पूर्ण व्हाव्या अशी शासनाकडे विनंती केली. त्यांच्या प्रमुख मागण्या पैकी. मंगल कार्यालयात लग्न तसेच इतर संभारंभसाठी ५० एवजी २०० ते ३०० लोकाना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी, जो पर्यंत व्यवसाय नियमित होत नाही तोपर्यंत व्यवसायसाठी घेतलेले बैंकच्या कर्ज वरील व्याज भरन्याबाबत शिथिलता देण्यात यावी. अशा विविध मागन्या घेवून त्यांनी प्रशासनाच्या नियमानुसार कायद्याचे उल्लंघन न करता कार्यक्रमप्रसंगी मास्क लावन्याचे, सैनीटायजरचे तसेच सोशल डिस्टनिंगचे नियम पाळून सहकार्य करू असे आश्वासन दिले याप्रसंगी भद्रावती कटरिंग असोसिएशन चे अध्यक्ष हनुमान घोटेकर, डेकोरेशन असोसिएशन चे अध्यक्ष किशोर खंडाळकर तसेच मंगल कार्यालय व लान असोसिएशन चे अध्यक्ष मनोज घोडमारे व समस्त कटरिंग व्यवसायीक उपस्थित होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here