Home Breaking News चंद्रपुरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

चंद्रपुरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

चंद्रपुरातील मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण मोहिमेचे होत आहे सर्वत्र कौतुक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  चंद्रपुरातील मनपा प्रशासनाने सध्या अतिक्रमनाची मोहीम राबवण्याची सुरुवात केलेली आहे, या अतिक्रमणामध्ये रस्त्यावरील नालीवर आणि नालीच्या बाजूला व फूटपाट वरील छोट्या-मोठ्या दुकानदारांनी व मोठमोठ्या दुकानदारांनी आपले अतिक्रमण थाटून चंद्रपुरातील रस्ते जाम केलेले आहे,

या अतिक्रमणामुळे पायदळ चालणारे व वाहन ठेवताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता व या दुकानदारांना मनपा तर्फे वारंवार नोटीस व माहिती देऊनही सुद्धा दुकानदार आपले रस्त्यावरील अतिक्रमण थाटण्यास मस्त होते, आणि मनपांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास तयार नव्हते,

म्हणूनच चंद्रपुरातील मनपा आयुक्तांनी सध्या अतिक्रमणावर मोहीम चालवण्याचे ठरवलेले आहे, आणि या मोहिमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कारण चंद्रपुरात आधीस लाहान रस्ते आहे, आणि त्यातही दुकानदार आपले अतिक्रमण थाटत असल्यामुळे चंद्रपुरात नागरिकांना खुप नाहक त्रास सहन करावा लागत होता,

परंतु आता चंद्रपुरातील अतिक्रमण मोकळे करण्याचे काम मनपा प्रशासनाने हाती घेतलेले आहे, व ही मोहीम झोन tu झोन नुसार घेण्यात येत आहे, व आज दिनांक 13,05,2024, ला झोन क्र, 1 मधील अतिक्रमण काढन्यात आले, या अगोदर सुद्धा सिटीतील अतिक्रमण काढण्यात आले, व उर्वरित अतिक्रमण सुद्धा स्टेप बाय स्टेप काढण्यात येणार आहे, म्हणूनच तर चंद्रपुरातील रस्ते आता मोकळा श्वास घेताना दिसत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here