Home चंद्रपूर धक्कादायक :- चंद्रपूर जिल्हातील पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या झाली १५ च्या वर !

धक्कादायक :- चंद्रपूर जिल्हातील पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या झाली १५ च्या वर !

सिंदेवाही तालुक्यात विरव्हा गावामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पुन्हा उडाली !

कोरोना अपडेट न्यूज :-

चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी एकूण ३ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये सायंकाळी सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे. दुपारी बल्लारपूर येथील ३७ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर सकाळी बाबुपेठ येथील एक युवती कोरोना पॉझिटिव्ह ठरली होती. एकूण आज तीन रुग्ण पॉझिटिव्ह ठरले आहे.
तर शनिवारी सायंकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदेवाई तालुक्यातील विरवा गावातील एक 16 वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह ठरली आहे. विरव्हा येथील यापूर्वीच नाशिक मालेगाव येथे काम करणाऱ्या एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाच्या कमी जोखमीच्या संपर्कातील ही 16 वर्षीय मुलगी असून तिला .देखील चंद्रपूर येथे संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
तर दुपारी बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील नागरिक मुंबईतील धारावी वस्तीमधून 20 मे रोजी बल्लारपूर शहरात पोचला होता. या व्यक्तीला आला त्याच दिवसापासून संस्थात्मक विलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात आले होते. 22 तारखेला सकाळी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज 23 मे रोजी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
तत्पूर्वीआज सकाळी चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरातील एक युवतीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली.तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
सिंदेवाही विरव्हा येथील या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 15 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. व आज शनिवारी एकूण ३ त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 15 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे .

Previous articleकारवाई :- कोटबाळा येथे सुभाष लालसरे  चालवीत असलेल्या दुकानाचा परवाना रद्द करा – गावकऱ्यांची मागणी !
Next articleक्राईम स्टोरी :- पत्नीनेच केला पतीच्या गळा आवळून खून, पतीच्या आत्महत्येचा दिखावा फसला !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here