Home चंद्रपूर कोरोना अपडेट :- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा भर, चीरोली...

कोरोना अपडेट :- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा भर, चीरोली येथे सापडला आणखी रुग्ण !

चंद्रपूर कोरोना अपडेट, जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोमवारी पोहचली २२ वर.पुन्हा वाढ होण्याची शक्यता ?

चंद्रपूर प्रतिनिधी:

जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत असून आजच आलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चीरोली या गावातील एक महीला पॉझिटिव्ह आढळल्याने आता जिल्ह्यात  एकूणसंख्या  २२ झाली आहे. सोमवारी सायंकाळी आणखी एका रुग्णाची त्यामध्ये भर पडली आहे. २३ मे रोजी या महिलेचा स्वॅब नमूना घेण्यात आला होता.
जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार मूल तालुक्यातील चिरोली येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातीत २६ वर्षीय महिला पॉझिटीव्ह ठरली आहे.
चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) २४ मे ( एकूण रूग्ण २ ) आणि २५ मे ( एकूण रूग्ण एक ) अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २२ झाले आहेत.

Previous articleक्राईम रिपोर्ट :-कोरपना येथे दारू तस्करी जोरात सुरू  पोलीस प्रशासन साखर  झोपेत?
Next articleधक्कादायक :- जीवती तालुक्यात जल व मुदसंधारण कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here