Home कोरपणा धक्कादायक :- जीवती तालुक्यात जल व मुदसंधारण कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार ?

धक्कादायक :- जीवती तालुक्यात जल व मुदसंधारण कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार ?

चिखली जल युक्त योजना फसली नाला खोलीकरण ढाळीचे बांधकाम अर्धवट !

प्रमोद गिरडकर :-

राज्य शासनाने गत ४ वर्षात दुर्गम आदिवासी दुष्काळग्रस्त गावातील भूगर्भातील पाणी पातळी वाढवावी व जमिनीमध्ये सुपीकता निर्माण होऊन उत्पादन वाढावे यासाठी व्यापक स्वरूपात राज्यभर योजनेचा प्रारंभ केला होता, चद्रपुर जिल्ह्याच्या तेलगांना सिमेवरील डोंगरी तालुक्याचा पाणी प्रश्न सुटावा म्हणुन 30 ते 3५ गावासाठी संयुक्त जल व मुदसंधारण कामाकरीता कोट्यावधीचा निधि उपलब्ध झाला व योजनेची काटेकोर व प्रभावी अमलबजावणी व्हावी , म्हणुन शासनाने योजनेसाठी दिशा निर्देश व परिपत्रक काढुन जबाबदारी निश्चीत केली या कामावर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेवर किती कामे तपासावी हे देखिल निश्चीत केले होते, विकसीत करावयाच्या पानलोट विकास आराखडा व जागेची पाहणी स्थळ निरीक्षण सर्व्हेक्शन करूण प्रस्ताव मान्यता यासाठी तालुका स्तरीय समीती गठीत केली होती आणि या विकास कामामध्ये वनविभाग जलसंधारण पाटबंधारे, कृषी व इतर विभागाकडुन नियोजन कृती आराखडयानुसार कामे करणे अपेक्षीत असताना कार्यालयात बसुनच सर्व प्रक्रीया केल्याने अनेक कामे तांत्रीक दुष्टया अयोग्य पद्धतीने केल्यामुळे या जलयुक्त योजनेचा बट्ट्याबोळ झाला असे चित्र असून जिवती तालुक्यात नियमबाहय कामे केल्याचा आरोप आता गावकरी करीत आहे, ज्या ठिकाणी नालाखोलीकरण करण्यात आले तिथे पाषान दगड आहेत खोलीकरण ५ ठिकाणी दाखविले ते काम गतवर्षी पाऊस हंगामापुर्वी घाईघाईने करुण अर्धवट व निकृष्ठ दर्जाचे केल्याने पाणी तर अडले नाही मात्र निधी मात्र अधिकारी आणि कंत्राटदारांनी जिरवला असल्याचे आता शेतकरी बोलु लागले आहे. चिखली या शिवारात ढाळीचे बांध अपूर्ण सोडून दिले आहे त्यात गट क्र१ /३ गटक्र१ /४ गट क्र१ / ५ गट क्र१ / ६ मध्ये काम प्रस्तावित केली मात्र ती कामे नमूद शेतात न करता ती काही वेगळ्या ठिकाणी सुद्धा केली परंतु सदर काम केले नसताना काम पुर्ण दाखऊन शासनाचा निधि खर्च केल्याचे दाखविण्यात आले. यामधे कृषी विभागाने पानलोट शिवारात पाणी तर जमा होईल असे काम न करता सन २०१८ ,१९ मध्ये एक सि ना बा पुर्ण तर दुसरा अर्धवट प्रगतीवर असल्याची माहीती गावकऱ्याना आहे मा ना बा काम पुर्ण झाले मात्र अपात्र जागेवर व निकृष्ठ बाधकाम झाल्यामुळे जल युक्त शिवार योजनेला लाभ कोणाला ? असा सवाल उपस्थीत होत आहे शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्रयस्त यंत्रणा जिवती तालुक्यात कोनती कामे तपासली व त्यामध्ये त्रुटी नाही का ? सन २०१ ६ ते २०१८ पर्यंत मा ना बांध गाळ काढणे या कामावर अनेक गावात गाळ न काढता निधि खर्च झाला कसा ? व गाळ गेला कुठे ? लाभक्षेत्रात माती नसल्याने गाळ होता का ?असे अनेक प्रश्न उपस्थित होऊन जल युक्त शिवार योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने आता गावकरी पुढे येऊन चौकशी व कार्यवाहीची मागणी करू लागले आहे. त्यामुळेच शेतकऱ्याच्या हितासाठी ७ कोटी गेले कुठे ? याबद्दल प्रश्न उभा राहत असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here