Home चंद्रपूर सावधान :-सीमावर्ती भागातील नागरिकांनो सतर्कता बाळगा, पोलिसांचे आव्हान !

सावधान :-सीमावर्ती भागातील नागरिकांनो सतर्कता बाळगा, पोलिसांचे आव्हान !

तेलंगानातून येणाऱ्यांची माहिती लगेच कळवा,पोलिसांनी केले नागरिकांना आव्हान ! 

गोंडपिपरी :- तालुका प्रतिनिधी

संपूर्ण विश्व जगताला हैराण करुन सोडणार्‍या कोरोना या महामारी संकटामुळे संपूर्ण देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर रोजगाराच्या शोधात परराज्यात गेलेले मजूर आता परतीच्या वाटेने राज्यात प्रवेश करीत असून कोरोणाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी तुम्हीच तुमचे रक्षक म्हणून सीमावर्ती भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगून परराज्यातून पायदळ येत असलेल्या व्यक्तींची माहिती वेळीच कळवा असे आवाहन पोलीस स्टेशन धाबा चे ठाणेदार सुशील धोकटे व लाठी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप कुमार राठोड यांनी केले आहे.
तत्पूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही रोजगाराच्या शोधात महाराष्ट्र राज्यातून अनेक मजूर विविध राज्यांमध्ये कामासाठी गेले होते. विशिष्ट म्हणजे सीमावर्ती भागासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्या चे मजूर हे मिरची तोडण्यासाठी तेलंगाना आंध्रप्रदेश राज्यात नेहमी जात असतात. अशातच कोरोना या महामारी ने सर्वत्र थैमान घातले असताना उद्भवलेल्या लॉक डाऊन परिस्थिती मुळे हजारो नागरिक परराज्यात अडकलेत. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या टाळेबंदी मध्ये संपूर्ण राज्याच्या सीमा तसेच जिल्हा सीमा बंद केल्याने परराज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांना आता हाती कामा अभावी व तेथील प्रशासन अन्नधान्याची निकड पूर्तता करीत नसल्याने बहुतांश मजुरांनी आता परतीची वाट धरली आहे. गोंडपिपरी तालुका हा राज्य सीमेवर वसलेला असून सदर तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने तेथे अडकलेले बहुतांश मजूर आता सीमावर्ती भागातून महाराष्ट्र राज्यात परत येत आहे. येणारे मजूर हे शेकडो किलोमीटर अंतर पायदळ प्रवास करीत विविध जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येत असून तेलंगणा राज्यात बहुतांश जिल्हे हे कोरोना बाधित रेडझोन मध्ये असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आता गोंडपिपरी तालुक्यातील सीमावर्ती भागातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःचे कर्तव्य समजून मीच माझा रक्षक हे ध्येय अंगीकारून पलीकडल्या राज्यातून येणाऱ्या मजूर व नागरिकांवर पाळत ठेवून याची त्वरित माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन उपपोलीस स्टेशन धाबा चे ठाणेदार सुशील धोकटे व लाठी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप कुमार राठोड यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीतून केलेले आहे.

Previous articleखळबळजनक घटना :- एका अल्पवयीन १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न,
Next articleदुःखद वार्ता :- मनीष टेमुर्डे यांचा दुर्दैवी अपघात  ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here