Home चंद्रपूर सनसनिखेज:- पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गायी सह रमेश वेलादी हा गुराखी ठार...

सनसनिखेज:- पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात एका गायी सह रमेश वेलादी हा गुराखी ठार !

वनपरिक्षेत्रातील करवन,काटवन तालुका मुल येथील घटना !

मुल :-

तालुक्यातील करवन व काटवन या बफरझोन मधील जंगलात गुरे चरत असतांना अचानक वाघाने केलेल्या हल्यात एक गाय व एक गुराखी ठार झाल्याची सनसनिखेज माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.ही घटना आज दि.२५-६-२०२० रोजी दुपारी १२,ते१२-३० वाजताचे दरम्यान घडली असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार करवन या गावातील रमेश वेलादी व इतर चार जण गावातील गुरे ढोरे घेऊन नेहमी प्रमाणे जंगलात चराईसाठी घेऊन गेले असता कक्ष क्रमांक ७६७ मध्ये गुरे चरत असतांना पट्टेदार वाघाने एका गाईवर हल्ला केला रमेश वेलादी व इतरांनी आरडाओरड केल्याने वाघाने गाईला सोडुन पळतांना त्या बाजुला रमेश वेलादी हा इसम दिसताच वाघाने झडप घालुन रमेश ला ठार केल्याची घटना घडली. उपस्थितांपैकी एकाने गावाकडे धाव घेत सदर घटनेची माहिती गावकऱ्यांना व वन विभागाला दिली. घटनास्थळी वनपरिक्षेत्राधिकारी,बोबडे साहेब,वनरक्षक वासेकर मॅडम,बि.के.परचाके,पोलिस कर्मचारी यांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासनी करिता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे आणन्यात आला. तातडीची मदत देण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here