Home भद्रावती आता रडायचं नाही लढायचं:- खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात...

आता रडायचं नाही लढायचं:- खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचा पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात एल्गार

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन !

भद्रावती:-

डिझेलचे वाढते दर कमी करून सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळण्याकरिता या दरवाढीविरोधात भद्रावती येथे धरणे आंदोलन करण्यात आले, यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे  दर कमी असताना त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळत नसल्याचे  दिसून येत आहे, नव्हे त्याउलट मोठ्या प्रमाणात दर वाढ होऊन सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम  मोदी सरकार करीत आहे.आता या अन्यायकारक  निर्णया विरोधात रडायचं नाही तर लढायच असे आवाहन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले आहे, भद्रावती येथे आयोजित पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेस तफॆ धरणे आंदोलनात ते बोलत होते, भद्रावती येथे याप्रसंगी  महेश शितोळे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, यावेळी मा प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा भद्रावती क्षेञ मा भगतसिंग मालुसरे अध्यक्ष युवक काँग्रेस भद्रावती मा संजीवकुमार पोडे संचालक कू.उ.बा. समिती भद्रावती मा लक्ष्मण बोढाले सर याची उपस्थिती होती केंद्रात मोदीची सरकार येण्याआधी गॅस सिलेंडरचे भाव फक्त 300 रुपये होते त्यावेळी मार्केटिंग करीत या किमंतीत सर्वात जास्त असल्याच्या गवगवा भाजप सरकारने केला होता.माञ आता गॅस सिलेंडर चे भाव.900 रूपयांच्या घरात आहे त्यामुळे घरची गूहीणीचे बजेट कोलमडले आहे त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दर कमी असताना त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळत नसल्याने दिसून येत आहे त्याउलट मोठ्या प्रमाणात दरवाढ होऊन सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम मोदी सरकार करीत आहे असे प्रतिपादन मा प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा भद्रावती क्षेञ यांनी केले आहे

Previous articleखळबळजनक :- ब्रम्हपुरी तालुक्यातून ८ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने उडाली खळबळ !
Next articleचिंताजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत वाढ सुरूच, बाधितांची संख्या ११३ वर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here