कृषी केंद्रातील कृषी साहित्य व बियाणे साठा अहवाल सादर करण्याच्या नावाखाली वसुली?
भद्रावती :-
जिल्ह्यात कृषी केंद्राच्या कृषी साठ्याबद्दल कृषी अधिकारी अहवाल मागताहेत हे नियमाला धरून आहे, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचे सोडून स्वतःचे खिसे गरम करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी अधिकारी कृषी केंद्राच्या संचालकांना पैसे मागतात हे अत्यंत खेदजनक असून असला प्रकार संपूर्ण जिल्ह्यात असला तरी एक कृषी अधिकारी यांनी पैशाची मागणी करतं असल्याची ऑडिओ आता व्हायरलं होतं असून तो कृषी अधिकारी कोण याबद्दल तर्क वितर्क लावले जातं आहे.
चालू शेती सीजन मध्ये शेतकऱ्यांनी जी बियाणे, रासायनिक खते व औषधी विकत घेतली त्याची गुणवत्ता तपासली जावी यासाठी कृषी अधिकारी जबाबदार असतात पण ते स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधन्याच्या प्रयत्नात असतात हे आता स्पष्ट झालं असून वरोरा भद्रावती असा प्रवास केलेला त्या कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्राच्या संचालकांना पैसे मागितल्याची ऑडिओ व्हायरलं होणार असल्याने तो कृषी अधिकारी कोण हे लवकरच समोर येणार असल्याचे बोलल्या जातं आहे.