Home चंद्रपूर सनसनिखेज :- अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात?

सनसनिखेज :- अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात?

दोन आरोपीना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून अटक तर तिसरा आरोपी फरार. 

चंद्रपूर :-

मनसेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर चंद्रपूर शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये अज्ञात इसमाने जवळून केलेल्या गोळीबारात गोळी पाठीत लागून ते गंभीर जखमी झाले होते, दरम्यान प्रथम कुबेर च्या खाजगी रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले व ऑपरेशन करून गोळी काढण्यात आली, या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती, पोलिसांसमोर या घटनेने आरोपीना पकडाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते, या दरम्यान बल्लारपूर येथील सूरज बहुरिया हत्त्याकांड यांच्याशी सुरुवातीला याचे धागेदोरे असेल असे वाटतं असतांना आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला असून नागपूर च्या कारागृहात घडलेल्या अमन अंदेवार आणि कारागृहातील तीन कैदी यांच्यात झालेल्या भांडणाचा या गोळीबार प्रकरणी संदर्भ जोडला जातं आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून दोघांना अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

अमन अंदेवार यांच्यावर झालेल्या गोळीबारातील आरोपीना पकडण्यासाठी पोलिसांच्या सहा तुकाड्या तयार करण्यात आल्या व जिल्ह्यातील बल्लापरपूर, चंद्रपूर घुग्गुस व दुर्गापूर या ठिकाणी घडलेल्या गोळीबाराचा या प्रकारणाशी काही संबंध आहे का? हे तपासण्यासाठी तब्बल 40 आरोपीना विचारणा करण्यात आली, दरम्यान पोलिसांनी कालपासून ज्या संशयित आरोपीना पकडले होते व शहर पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बसवून ठेवण्यात आले होते ते मुळात आरोपी नसल्याचे निस्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे दुसरीकडे वळवली, आरोपी नागपूर जिल्ह्यात पळून गेल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी दोन आरोपीना उमरेड येथून अटक केली तर एक उत्तरप्रदेश येथे पळाला असल्याची माहिती आहे.

बच्ची गैग चा गेम प्लॅन?

संघटित गुन्हेगारीत बच्ची गैग मोठी असून त्याचा मास्टरांमाईंड बच्ची यादव उर्फ विनय अरक यांच्यासोबत अमन अंदेवार यांची नागपूर च्या कारागृहात हमरीतुमरी झाली असल्याची माहिती असून त्या घटनेतील बदल्याच्या भावनेने हा गोळीबार झाला असल्याची माहिती आहे, या प्रकरणाची स्क्रिप्ट चंद्रपूर येथेच लिहिली गेली असावी कारण या आरोपी पैकी दोघे मोरवा आणि कोरपणा येथील असल्याची माहिती आहे तर तिसरा आरोपी फरार झाला आहे. दरम्यान आरोपीच्या शोधात पोलीस असून लवकरच तिसरा आरोपी मिळेल अशी शक्यता वर्तवली जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here