Home चंद्रपूर खळबळजनक :- बल्लारपूर येथील कपडा दुकानावर पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार.

खळबळजनक :- बल्लारपूर येथील कपडा दुकानावर पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार.

बल्लारपूरातील मालू वस्त्र भंडार येथील घटना, नौकराच्या पायाला लागली गोळी. शहरात खळबळ.

 

चंद्रपूर शहरात झालेल्या गोळीबारची शाई वाळत नाही तोच गुन्हेगारीत अग्रेसर असणाऱ्या बल्लारपूर येथील गांधी चौकात मालू वस्त्र भांडार या दुकानावर पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करून गोळीबार केल्याने दुकानदाराच्या नौकराच्या पायाला गोळी लागली आहे, दरम्यान सर्वात मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानावर अज्ञात व्यक्तींद्वारे आज दिनांक 7 जुलै ला दुपारी 12.00 च्या सुमारास झालेला पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबार यामुळे बल्लारपूरात खळबळ उडाली आहे.

कधीकाळी शांतताप्रिय असलेला चंद्रपूर जिल्हा हा राजकीय संघटित गुन्हेगारीमुळे क्राईम कॅपिटल कडे वाटचाल करीत असल्याचे विदारक चित्र दिसतं आहे. चंद्रपूर येथील रघुवंशी कोम्प्लेक्स मध्ये झालेल्या गोळीबाराची दहशत समाजमनावर पसरली असतांना बल्लारपूर येथील पेट्रोल बॉम्ब ने झालेला हल्ला व त्यानंतर बंदूकीने झालेला गोळीबार यांमुळं दिवसा ढवळ्या चाललेल्या या गुन्हेगारीवर पोलिसांनी अंकुश लावावा अशी मागणी होतं आहे.

बल्लारपूर येथे झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात व गोळीबारात दुकानातील एका नौकराच्या पायाला गोळी लागल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर ला हलवले असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी CCTV फूटेज तपासून त्या दिशेने तपास सुरू केला आहे. दरम्यान हा दुश्मनी काढण्याचा कट असून मालू यांचे दुकान मागे शार्टसर्किट मुळे जळाले होते ते पुन्हा नव्याने बांधून सुरू केले मात्र आता पुन्हा पेट्रोल बॉम्ब हल्ला करून दुकानाच्या काचा फोडल्या गेल्याची माहिती आहे. या घटनेतून गुन्हेगारीने डोके वर काढून दहशत निर्माण झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे चित्र दिसतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here