Home चंद्रपूर धक्कादायक :- दारू किंग नागो यांचा संपादकाला चक्क अँटी करप्शन च्या नंबर...

धक्कादायक :- दारू किंग नागो यांचा संपादकाला चक्क अँटी करप्शन च्या नंबर वरून फोन ?

फोनवरून पैशाची बोलणी करून फसविन्याचा प्रयत्न ?

चंद्रपूर :-

भद्रावती शहरात अवैध दारू विक्री करीत असलेल्या दारू किंग म्हणून कुख्यात नागो नागपूरे यांनी बातमी का लावली याचे उत्तर मिळविण्यासाठी संपादकाला चक्क अमोल अँटी करप्शन असे ट्रू-कॉलर वर नाव असलेल्या नंबर वरून फोन केल्याचे समोर आल्याने आता पोलिस प्रशासनासोबतच अँटी करप्शन विभागाचा साथ दारू तस्कर घ्यायला लागले का ? असा प्रश्न या अर्थाने चिंतेचा बनला आहे. महत्वाची बाब म्हणजे जर आपण पोलिस किंव्हा चौकशी विभागाच्या नंबर ची ट्रू -कौलर वर सेट्टिंग केली तर समोरचा माणूस असाच घाबरतो त्यासाठी ही सेट्टिंग तर नागो ने केली नसावी? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळी जवळपास नऊ च्या दरम्यान ऑनलाईन फोन नंबर वरून (जो मोबाईल नंबर दिसत नव्हता )आलेल्या अमोल अँटी करप्शन नंबर या नंबर ची चौकशी करणे आता क्रमप्राप्त झाली असून स्वतःचा मोबाईल क्रमांक न देता अँटी करप्शन च्या ट्रू -कौलर वरून फोन करून संपादका ला धमकावण्याचा व पैशाची गोष्ट करून फसवीण्याचा डाव तर नागो खेळत नसेल ना अशाही संशयाला वाव आहे यावरून स्वतःचे अवैध व्यवसाय वाचविण्यासाठी समोरच्या माणसाला फसवीण्याचा डाव नागो ने खेळला असला तरी तो फसला आहे आणि म्हणून याची दखल पोलिस प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here