Home चंद्रपूर क्राईम स्टोरी :- कोलाम जातीच्या महिलेला रफिक शेख याची शरीर सुखाची मागणी,...

क्राईम स्टोरी :- कोलाम जातीच्या महिलेला रफिक शेख याची शरीर सुखाची मागणी, रामनगर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल. 

ठाणेदार आवारे यांनी पिडितेची तक्रार घेण्यास नकार. पिडितेची ठाणेदार विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल,

चंद्रपूर:-
जीवती तालुक्यातील अम्बेझरी गावात एका आदिवासी कोलाम जातीच्या महिलेस वेळोवेळी शरीर सुखाची मागणी करून व इतर साथीदारांच्या माध्यमातून तिला एकांत ठिकाणी बोलवून तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या रफिक शेख यांच्या विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे पीडित महिलेने तक्रार दाखल करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेत पोलिस प्रशासनाकडे केली आहे. मग
महत्वाची बाब म्हणजे पिट्टिगुडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार आवारे यांनी पिडितेची तक्रार न घेता आरोपी ला वाचविण्याचा प्रयत्न केल्याने पिडितेला जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे धाव घ्यावी लागली हे विशेष !
पिडीत महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की ती आदिवासी कोलाम जातीची असून तिचे लग्न सन २०११ ला अम्बेझरी इथे रितीरिवाजाने झाले व मोलमजुरी करून नवरा बायको जीवन जगत आहे, परंतु रफिक शेख याची वाईट नजर तिचे वर सन २०१७ पासून होती पण ती त्याच्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होती परंतु तिचे पती घरी नसताना नेहमीच रफिक शेख घरी येण्याचा प्रयत्न तो करायचा पण ती त्याला कधीही भीक घातली नव्हती व ही बाब पतीला ती सांगत होती पण गावात पैसेवाला आहे म्हणून रफिक शेख यांच्या विरोधात कुणाला सांगितल तरीही कुणी ऐकून घेत नव्हत. एके दिवशी शाम शिंदे यांनी तिला घरी येवून सांगितले की तुला रफिक बोलावत आहे. त्यावर तिने मी कुठेच येणार नाही असे सांगितले असता पुनः कविता आत्राम यांना तिच्या घरी धोक्यात पाठवून बोलवले असता ती गेली तेव्हा माझ्या सोबत सबंध ठेव मी तुला सर्व काही देतो त्यावर असे तो म्हणाला मात्र पीडित महिलेने नाही म्हटले तर पुनः एके दिवशी तो पिडितेच्या घरी आला आणि मला “तू माझ्याकडे येते की मी तुझ्याकडे येवू ” असे बोलला असता तिने म्हटले की मला माझा पती आहे मुल आहे आणि मी असे काम करीत नाही तर त्यावर त्यानी तिचे सोबत जोर जबरदस्ती शारीरिक सबंध बनविण्याची धमकी दिली.
या सर्व तिचेवर घडलेल्या प्रसंगाची तक्रार पिट्टिगुडा पोलिस स्टेशन मधे दिनांक ६ जून २०२० ला दिली मात्र ठाणेदार आवारे यांनी तक्रार न घेता उलट तिचे वर दबाव टाकून त्या रफिक विरोधात तु तक्रार दाखल करून काय करशील ? तेवढी तुझी आणि तुझ्या परिवाराची हिंमत आहे का ? यानंतर माझ्या पोलीस स्टेशन मधे येवू नका जिथे जायचे आहे तिथे जा असे धमकावून घरी जाण्यास सांगितले व त्यांच्या कडून खूप लोक आहे ते पैसे वाले आहे तुम्हाला कोण विचारतो असे म्हणून हाकलून दिले.

आदिवासी कोलाम समाजातील एक गरीब स्त्रीवर मानसिक त्रास होत आहे व तिची गावात बदनामी केल्या जात आहे तरी देखील पोलिस प्रशासन जर न्याय देत नसेल तर अशा पोलिस अधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषद घेवून पीडित महिलेने केली आहे, याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू.पीडित महिलेचे पती व उपसरपंच रामराव राठोड उपस्थित होते. या प्रकरणी रामनगर पोलिस स्टेशन येथे रफिक शेख व इतरांनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here