Home चंद्रपूर धक्कादायक :- लॉक डाऊनच्या काळात महापौर यांच्या नातेवाईकांनी हडपली मनपा कब्जातील जागा...

धक्कादायक :- लॉक डाऊनच्या काळात महापौर यांच्या नातेवाईकांनी हडपली मनपा कब्जातील जागा ?

सर्वसामान्यांना नोटीस न देता अतिक्रमण तोडणारे मनपा प्रशासन आता महापौरांच्या नातेवाईकांचे अतिक्रमण तोडणार का ?

चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार भाग -4

एकीकडे चंद्रपूर महानगर पालिका प्रशासन नझुल च्या जागेवरचे अतिक्रमण तहसीलदार यांचे आदेश नसताना स्वतःच कायदा हातात घेवून तोडते तर दुसरीकडे तहसीलदार यांचे अतिक्रमण तोडण्याचे आदेश असताना मनपा प्रशासन मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण हटाव दस्ता घेवून जाऊन सुद्धा ते अतिक्रमण राजकीय आणि आर्थिक दबावाने तोडत नाही एवढेच नव्हे तर मनपा च्या अधिनस्त असणाऱ्या जागेवर जे अतिक्रमण केल्या जाते ते अतिक्रमण धनदांडगे यांचे असल्याने ते पण तोडल्या जात नाही व सत्तेचा दुरुपयोग करून सत्ताधारी ते अतिक्रमण जणू अधिकृत आहे असे दाखवतात म्हणजे महानगर पालिका प्रशासन हे गोरगरीब व सर्वसामान्यांना कायदा सांगणार व ज्या धन दांडग्यानी अतिक्रमण केले त्यांची पाठराखण करणार. मग यासाठीच शहरातील जनता ह्या नगरसेवकांना निवडून देतात का ? हा अतिशय गंभीर प्रश्न असून सत्तेचा माज चढलेल्या काही सत्ताधाऱ्यांना जनता केंव्हा धडा शिकवणार ? हे कोडे मात्र समजायला मार्ग नाही.

मनपा प्रशासनाने सामजिक कार्यकर्ते राजेश बेले हे कोरोनटाईन सेंटर मधे उपचार घेत असताना त्यांनी मनपाच्या त्या सेंटर वरील होणारी अव्यवस्था या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, मात्र मनपा प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल झाल्याने चवताळलेल्या मनपा प्रशासनाने राजेश बेले यांचे घराचे बांधकाम तोडले मग लॉकडाऊन च्या काळात आपत्ती व्यवस्थापन कलम लागू असताना जनार्धन मेडिकल चे कंचर्लावार यांनी चंद्रपूर मनपा हद्दीत येत असलेल्या सराई मार्केट जेटपुरा गेट जवळील जागेवर अतिक्रमण केले ते मनपा प्रशासन तोडणार का ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महत्वाची बाब म्हणजे मनपा महापौर यांचे जनार्धन मेडिकल चे मालक नातेवाईक असल्याने चोरी छुपे हे अतिक्रमण केले असल्याची चर्चा असून एका गरीब व्यक्तींच्या गेल्या अनेक वर्षापासून कब्जा असलेल्या दुकानाला उध्वस्त केल्याची माहिती आहे. मनपा प्रशासन रस्त्यांवर अतिक्रमण झाले म्हणून त्यांच्या स्वतःच्या हद्दीत असणाऱ्या शामराव गेडाम यांचे विटाचे वॉल कंपाउंड़ पूर्व सूचना न देता तोडते व स्वतः बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या नरेंद्र गेडाम यांच्या दोन मजली इमारतीची पाठराखण करते.त्याच प्रमाणे आता जनार्धन मेडिकल च्या कंचर्लावार यांची पाठराखण करणार का ? की मनपा च्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण व कब्जा केलेल्या जागेवरचे अतिक्रमण तोडणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here