Home चंद्रपूर लक्षवेधी :- सुधीरभाऊ, महापौरांच्या परिवारांचे मोक्याच्या जागेवरील अतिक्रमण व बांधकाम काढणार का...

लक्षवेधी :- सुधीरभाऊ, महापौरांच्या परिवारांचे मोक्याच्या जागेवरील अतिक्रमण व बांधकाम काढणार का ?

 

लक्षवेधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहे, कारण त्यांच्यावर अजूनपर्यंत भ्रष्टाचाराचे मोठे आरोप नाही तर उलट सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात व विकासाच्या द्रुष्टीने ते शासन प्रशासनाकडे नेहमीच पाठपुरावा करतात. त्यामुळेच त्यांच्यावर सर्वसामान्य जनतेचा विश्वास असल्याने चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांना मोठ्या संख्येने चंद्रपूर शहरातील जनतेने निवडून दिले, पण शहराच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका वठविण्याची मोठी जबाबदारी ज्या सुधीर मुनगंटीवार यांनी राखी कंचर्लावार यांना महापौर पद बहाल करून दिली त्या महापौर राखी कंचर्लावार यांच्या पती व नातेवाईकांचे शहरातील मोक्याच्या जागेवरील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम बघून कुणीही सुज्ञ नागरिक प्रश्न करेल की आपले अवैध व बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण वाचविण्यासाठीच कंचर्लावार ह्या महापौर झाल्या का ? विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस मधून आलेल्या कंचर्लावार यांना एवढे महत्व का दिले ? काय भाजप मधे महापौर पद सांभाळण्यासाठी सक्षम व्यक्तिमत्व नव्हतं का ? या व अशा अनेक प्रश्नांना सद्ध्या चर्चेतून पेव फुटले आहे. महत्वाची बाब म्हणजे महापौर यांच्या स्वतःच्या परिवारातील सदस्यांचे अनेक अवैध बांधकाम, व अतिक्रमण नझुल व मनपा जागेवर असतांना सामजिक कार्यकर्ते राजेश बेलेचे बांधकाम तेंव्हा तोडले जाते जेंव्हा ते महानगर पालिकेच्या कोविड सेंटर वरील असुविधा व निकृष्ट दर्जाचे जेवणा विषयी सामाजिक प्रसारमाध्यमातून आपला आक्रोश व्यक्त करतात, एवढेच नव्हे तर ते कोविड सेंटर मधे कोरोनटाइन असताना व घरी कुणी नसताना त्यांच्या घराचे बांधकाम तोडल्या जाते, मग हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला नाही का ? मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात कुणी बोलले म्हणजे त्यांच्या मालमत्तेवर बुलडोजर फिरवायचा हा कसला नादानपणा ? खरं तर याविषयी मनपा आयुक्त फार गंभीर असेल असे वाटत नाही पण ज्या सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर मनपात आपली सत्ता स्थापन करताना जनतेला स्वच्छ व पारदर्शी शासन देवू याची ग्वाही दिली, त्या ग्वाही चे धिंडवडे स्वतः महापौर काढत असेल तर मग सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात गांभीर्याने निर्णय घेण्याची तसबी का घेवू नये ? हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे, विशेष म्हणजे स्वतः सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांनी (डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार) महापौर यांच्या नातेवाईकांचे वडगाव प्रभागातील शाळा व क्रिडागंन यासाठी राखीव जागेवर अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकामाची तक्रार मनपा आयुक्त यांना दिली असल्याने व चक्क त्यांच्या तक्रारीची पण दखल मनपा आयुक्त यांनी घेतली नसल्याने जिथे नेत्यांच्या वडिलांच्या तक्रारीचीच दखल होत नसेल तिथे सर्वसामान्य जनतेला मनपा प्रशासन व ह्या महापौर काय न्याय देत असतील ?

खरं तर  “विकलेला पत्रकार, घाबरलेला विरोधी पक्ष आणि झोपलेली जनता ही देशाच्या बर्बादीचे खरे कारण आहेत”

असे म्हटल्या जाते, ते चंद्रपूर शहरातील मनपा प्रशासनाबाबत खरे ठरत आहे, कारण एकीकडे कंचर्लावार परिवाराचे शहरातील अवैध बांधकाम व मोक्याच्या जागेवरील अतिक्रमण याविषयी व्रुतमालिका भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर सुरू असून मनपा प्रशासनाचे व एकूणच भाजप नेत्यांचे लक्ष याकडे वळावे व मनपा प्रशासनातील सत्ताधारी यांच्यावर वचक निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यांसाठी मोहीम सुरू आहे. तर दुसरीकडे मनपा चा प्रमुख विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमे या प्रकरणात गप्प आहे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल, मात्र कंचर्लावार परिवारातील सदस्यांचे जिथे जिथे अवैध बांधकाम व अतिक्रमण आहे, त्याचे सर्व रेकॉर्ड शहरातील सुज्ञ नागरिक स्वयंस्फुर्तिने आणून देत असल्याने महापौर यांच्या विरोधात पक्के पुरावे असल्याने त्यांच्याविरुद्ध मोठी कारवाई शासन स्तरांवर व न्यायालयात होऊ शकते अर्थात त्या कारवाईची वाट भाजप श्रेष्ठी बघत आहे का ? आता ज्या पद्धतीने शहरात चंद्रपूर मनपा प्रशासनाविरोधात व त्यातच सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश निर्माण झाला त्याला शमविण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार समोर येणार नाही का ? ज्या पद्धतीने चंद्रपूर मनपा न्यायालयाचे आदेश असताना शहरातील अनेकांचे अतिक्रमण व बांधकाम तोडत नाही आणि मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले की त्यांचे सूडबुद्धीने बांधकाम तोडल्या जाते मग चंद्रपूर महानगर पालिका प्रशासन व सत्ताधारी हे शहरातील जनतेसमोर आदर्श निर्माण करीत आहे की लोकशाहीची गळचेपी करीत आहे ? हे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कळत नसेल असे अजिबात नाही, पण त्यांनी महापौर राखी कंचर्लावार यांच्या नातेवाईकांच्या बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण यांवर कारवाई करावी अशी चंद्रपूर शहरातील तमाम जनतेची इच्छा आहे,
Previous articleमनसे इशारा :- बिडी उत्पादक कंपनीच्या बंडल वरून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव काढा,
Next articleकन्हाळगाव अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये पोशन अभियान जन आदोंलन कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here