Home वरोरा मनसे इशारा :- बिडी उत्पादक कंपनीच्या बंडल वरून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव...

मनसे इशारा :- बिडी उत्पादक कंपनीच्या बंडल वरून छत्रपती संभाजी महाराजांचे नाव काढा,

 

अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू, मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार तहसीलदार मार्फत डिलेल्यक निवेदनाततून इशारा.

वरोरा प्रतिनिधी :-

ज्या छत्रपती संभाजी महाराजानी 120 लढाया लढल्या पण एकही लढाई ते हरले नाही आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजा नंतर या महाराष्ट्राच्या मातीत त्यांनी परकीय आक्रमण परतवून लावून एक पराक्रमी राजा म्हणून ज्यांनी अख्ख्या जगात ओळख निर्माण केली अशा पराक्रमी महापुरुष संभाजी महाराज यांच्या नावाने साबळे वाघिरे आणि कंपनीच्या बिडी उत्पादक कंपनीने त्यांच्या नावाने बाजारात बिडया आणल्या आहेत. ती गोष्ट महाराष्ट्राच्या अस्मितेला छेद देणारी व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करणारी असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार वरोरा यांच्या मार्फत निवेदन देवून आपल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी राष्ट्रपुरूषांच्या नावांचा उपयोग करण्याचे पाप करणाऱ्या बिडी उत्पादक कंपनीविरोधात कारवाई करावी व संभाजी महाराजांचे नाव बिडी उत्पादक कंपनी च्या बिडी बंडल वरून तात्काळ बदलावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाणे, मनविसे तालुका अध्यक्ष गौरव मेले,मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, आकाश काकडे, व्रुषभ वानखेडे इत्यादींनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here